कोंढाळी येथे हळदी कूंकु व स्नेहभेटी चे आयोजन संपन्न

कोंढाळी- दुर्गा प्रसाद पांडे
चैत्र नवरात्री व नववर्षाच्या शुभमुहूर्तावर सबला महिला बचत गटाच्या अध्यक्षा आरतीताई अनिल देशमुख यांनी बुधवार, २९ मार्च रोजी दुपारी १२-०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत पाचबुधे सभागृह, रामनगर, कोंढाळी येथे स्थानिक महिलां सोबत हळदी-कुंकू व स्नेहभेटीचे आयोजन करण्यात आले. या निमित्त आयोजित हळदी-कूंमकु कार्यक्रमात कोंढाळी शहरातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. या आयोजन प्रसंगी वेळी आरतीताई अनिल देशमुख, रिद्धी सलील देशमुख, राहत ऋषी देशमुख, डॉ. पायल गौरव (देशमुख) चतुर्वेदी व सबला महिला बचत संस्थेचे पदाधिकारी, रा का च्या महिला पदाधिकारी व कोंढाळी गावातील महिला पदाधिकाऱ्यांनी महिला स्नेहसंमेलन व हळदी-कुमकुमच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.