नागपुर हेडलाइन

कोंढाळी येथे सेवानिवृत्त वन कामगाराचां निरोप समारंभ संपन्न

Summary

कोंढाली -वार्ताहर वनपरिक्षेत्र कोंढाळी अंतर्गत येथील सेवानिवृत्त वन कर्मचारी यांच्या सेवापूर्ती निमित्त वन परिक्षेत्र कार्यालय कोंढाळी येथे गुरूवारी सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोंढाळी वनपरिक्षेत्राधिकारी निशिकांत कापगते तर ज्येष्ठ समाजसेवक दुर्गाप्रसाद पांडे यांचे प्रमुख उपस्थितीत वन […]

कोंढाली -वार्ताहर
वनपरिक्षेत्र कोंढाळी अंतर्गत येथील सेवानिवृत्त वन कर्मचारी यांच्या सेवापूर्ती निमित्त वन परिक्षेत्र कार्यालय कोंढाळी येथे गुरूवारी सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोंढाळी वनपरिक्षेत्राधिकारी निशिकांत कापगते तर ज्येष्ठ समाजसेवक दुर्गाप्रसाद पांडे यांचे प्रमुख उपस्थितीत वन कामगार ममराज चव्हाण, तसेच सुखदेव सोहलीया यांच्या सेवापूर्ती निमित्ताने ३१आगस्ट रोजी दुपारी एक वाजता वनपरिक्षेत्र कोंढाळी चे प्रांगणात निरोप संमारभाचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच कोंढाळी वनपरित्रातून बदली झालेले तसेच या‌ वनपरित्रात नव्याने रूजू ‌झालेल्या वन अधिकारी ‌व वन कर्मचारी ‌‌यांचा ही या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्ती च्या निरोप संमारभाचे प्रसंगी वन कामगार ममराज चव्हाण यांनी आपल्या सेवेचे ३३वर्षाचे कामगिरी बाबद सांगितले की कोणत्याही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या सेवेत प्रामाणिकता, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करने, सोबतच आपल्याकडून कळत न कळत झालेली चूक लपविन्या पेक्षा ती माहिती किंवा चूक आपल्या वरिष्ठांना ताबडतोब कळविल्यास यातून मार्ग निघतो व गैर समज निर्माण होत नाही, , कोंढाळी सारख्या अतिसंवेदनशील वन परिक्षेत्र ३३वर्ष वन सेवेचे कामात त्रास किंवा तक्रार आली नाही. तसेच दुसरे सेवानिवृत्त वन कामगार सुखदेव सोहलीया ‌यांनी ही आपल्या ३०वर्ष वन कामगार म्हणून काम करत असतांना नेहमी सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. वन कामगार म्हणून काम करत असतांना वन व पर्यावरण ची सुरक्षा हे फार पुण्याचे काम आहे. आता पुढे ही वन सुरक्षेसाठी काम करत राहनार असे सांगितले.
याप्रसंगी दुर्गा प्रसाद पांडे, वनपरिक्षेत्राधिकारी निशिकांत कापगते, उपवन अधिकारी एफ आर पठाण, तसेच अनेक उपवन अधिकारी, वन रक्षक तसेच वन कामगारांनी सेवानिवृत्त वन कामगाराचे कामाच्या पद्धतीचे कौतुक केले अनेक वन रक्षकांनी आप आपले मनोगत व्यक्त केले.
दोन्ही वन कामगारांचा वन परिक्षेत्र अधिकारी व उपस्थित पाहूणे मंडळींनी वन कामगार ममराज चव्हाण व सुखदेव सोहलीया यांचा‌ सापत्निक सत्कार करण्यात आला.याप्रसंगी दोन्ही वन कामगारांचे कुटूंबातील ‌(नातू जावाई)नातेवाईक‌ ही उपस्थित होते.‌सोबच येथील बदलून गेलेले व येथील ‌वनपरिक्षेत्रात नव्याने रूजू झाल्यांचा ही सेवा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार उपवन अधिकारी अनिल नवघरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *