हेडलाइन

कोंढाळी येथे-जय-जय-जय!भीमऽऽऽऽच्या जयघोषांच्या गजरांत भव्य मिरवणूक

Summary

कोंढाळी येथे-जय-जय-जय!भीमऽऽऽऽच्या जयघोषांच्या गजरांत भव्य मिरवणूक वार्ताहर-कोंढाळी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डाॅ.बाबासाहेब आंम्बेडकर यांची१३१वी जयंती या वर्षी मोठ्या उत्साहात गुरूवारी साजरी करण्यात आली .सकाळी 10वाजता शनिवार पेठे येथील आंम्बेडकर नगर येथील मैत्री सममता दल बौद्ध विहार येथे भारत रत्न […]

कोंढाळी येथे-जय-जय-जय!भीमऽऽऽऽच्या जयघोषांच्या गजरांत भव्य मिरवणूक

वार्ताहर-कोंढाळी

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डाॅ.बाबासाहेब आंम्बेडकर यांची१३१वी जयंती या वर्षी मोठ्या उत्साहात गुरूवारी साजरी करण्यात आली .सकाळी 10वाजता शनिवार पेठे येथील आंम्बेडकर नगर येथील मैत्री सममता दल बौद्ध विहार येथे भारत रत्न बाबासाहेब यांना मानवंदना देण्यात आली.याच प्रमाणे येथील ग्राम पंचायत, राष्ट्रवादी कांग्रेस कार्यालय, आर बी व्यास महाविद्यालय,लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालय, व सी बी एस ई हायस्कूल, तसेच या परिसरातील सर्वच ग्रा प कडूनही डाक्टर बाबासाहेब आंम्बेडकर जयंती उत्सव थाटात साजरी करण्यात आली ।

जल्लोषात भव्य मिरवणूक

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण कोंढळी शहराला तोरण, निळे झेंडे व कमानींनी सजवण्यात आले होते.

14 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता कोंढाळी येथील शनिवार पेठेतील डॉ.आंबेडकर नगर, येथील समता मैत्री बौध्द विहार येथून अखिल भारतीय धम्म सेनेच्या भीम सैनिकांच्या माध्यमातून सर्व महापुरुषांचे सजावटी चित्र रथांसह लहान बालक, युवक, व ज्येष्ठ नागरिक(महीला-पुरूष-) माहापुरूषांचे चित्रांसह जंयतीउत्सव मिरवणुक काढण्यात आली होती.या जयंती उत्सव मिरवणूकीचे जागो जागी , सामाजिक, धार्मिक, राजकिय, व विविध संगठणांनी स्वागत केले व या मिरवनुकितील भाविकांना शरबत, थंड पाणी,फळे,मिठाई, काॅफी, चे वितरण करण्यात आले. जयंती उत्सव मिरवणूक शनिवार पेठ येथुन जय-जय- जय-भीम च्या जयघोषाने सुरू होऊन,स्थानीय विठ्ठल मंदिर, राम मंदिर, बाजार चौक, राऊत पुरा, एफ सी चौक,उमाठे नगर, राम नगर, पोलीस स्टेशन, चांदणी चौक (दानागंज), बसस्थानक विकास नगर मार्गे पंचशील नगर येथे महामानव डाक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करून टाका देवस्थान -मार्गेने परत शनिवार पेठ येथे परतले , येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

या प्रसंगी कोंढाळी चे ठाणेदार अजित कदम, पोलीस उपनिरीक्षक राम ढगे व पोलीस कर्मचाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

15 एप्रिल रोजी शनिचरा पेठेतील आंबेडकर नगरमध्ये अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *