‘ कोंढाळी येथे ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे’आज उद्घाटन पंतप्रधानांनी ऑनलाईन केले मार्गदर्शन

कोंढाळी -वार्ताहर :
नवरात्री च्या पाचवी माळ आदि शक्ती माता प्रार्थना करतांना देशातील प्रत्येक आई आपल्या पाल्यालाला सुखी समृद्धी होण्यासाठी प्रार्थना करित आहे. हाच धागा धरून पंतप्रधान म्हणाले की भारत सरकारने ३६ही राज्यात बेरोजगार तरुणांना कौशल्य पुर्ण अभ्यासक्रमातून रोजगार निर्मिती चे स्वप्न साकारणार आहे. असे ओघपूर्ण २०मिनिटाचे आँनलाईन भाषणातून मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र राज्यात
ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी व विकासाला चालना देणाऱ्या ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे’ उद्घाटन 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 04-30 वाजता नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे कोंढाळी नगरपंचायत येथील टेकाडे मंगलकार्यालयात संपन्न झाला . या केंद्राचे उद्घाटन (ऑन लाईन पद्धतीने) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. या प्रसंगी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांनी ही ऑनलाईन पद्धतीने केंद्राच्या माध्यमातून उद्योजकता वाढावी यादृष्टिने सहभाग वाढवावा असे आवाहन केले. या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी आयशा पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार
नागपूर विभागात एकूण 64 केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे वेऐ काटोल उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे तहसीलदार राजू रणवीर,नवघटित कोंढाळी नगर पंचायतींचे प्रशासक धनंजय बोरीकर,पं. स. बी डी ओ दीपक गरूड, नायब तहसीलदार राजेंद्र जंवजाळ, काटोल आय टी आय चे प्राचार्य, प्रशासनीक अधिकारी तसेच कौशल्य विकास रोजगार, उद्योग विकास विभागाचे – अधिकारी माजी आमदार डॉ आशिष देशमुख, राजकिय पक्षांचे पदाधिकारी तसेच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, शिक्षक, आशा व अंगणवाडी सेविका आणि तंत्र निकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांन सह नबीरा महाविद्यालय, लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालया विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात आपली हजेरी लावली.