कोंढाळी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता कार्यालयाचे विदारक चित्र वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष व दक्ष राहण्याची गरज
Summary
कोंढाळी -प्रतिनिधी -वार्ताहर नागपूर -अमरावती-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सहा/५३वरिल गतवैभव प्राप्त कोंढाळी चे विश्राम भवन (रेस्ट हाऊस)-व सार्वजनिक बांधकाम उपविभाग (राज्य)काटोल यांचे अधिनस्थ असलेले कोंढाळी शाखा अभियंता यांचे कार्यालयची भयान अवस्था दाविनारे चित्र, काटोल उपविभागीय बांधकाम विभागासी संबधी कॉरी पासेस, तांत्रिक […]
कोंढाळी -प्रतिनिधी -वार्ताहर
नागपूर -अमरावती-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सहा/५३वरिल गतवैभव प्राप्त कोंढाळी चे विश्राम भवन (रेस्ट हाऊस)-व सार्वजनिक बांधकाम उपविभाग (राज्य)काटोल यांचे अधिनस्थ असलेले कोंढाळी शाखा अभियंता यांचे कार्यालयची भयान अवस्था दाविनारे चित्र, काटोल उपविभागीय बांधकाम विभागासी संबधी कॉरी पासेस, तांत्रिक मंजुरी चे प्रांकलन प्रपत्र व सा. बा. संबधी अन्य कागदपत्रे ओरडून सांगत आहेत की हे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालया संबधी अधिकारी कार्यालय आहे. आधी येथे सा बा उपविभाग काटोल कोंढाळी शाखा अभियंता यांचे मुख्यालय होते आजही आहे पण या कडे सा बा चे कोणतेही अधिकार ढूंकूणही पाहत नाहीत.
नागपूर -मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील गत वैभव प्राप्त विश्राम भवनाच्या सर्व वस्तू चोरीला गेल्याअसून बांधकाम विभाग यांच्या अधिकारी यांचे कडून होणारे दुर्लक्ष पणाचा फटका एखादी विभागाला व गावाला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडू नये हि प्रार्थना.
“कोंढाळी येथील विश्रामगृहाची दुरूस्ती, कोंढाळी शाखा अभियंता यांनी कोंढाळी मुख्यलयी रहावे, हे रेस्ट हाउस १९२४चे आधिचे आहे. ग्राम पंचायत पांजरा काटे मधे आहे. माननीय आमदार अनिल दशमुख खासदार कृपाल तुमाने,जि प सदस्य सलील देशमुख , सभापती संजय डांगोरे, पांजरा काटे सरपंच वानखेडे मैडम, उपसरपंच संजय सावरकरज, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर (२) यांनी या प्रकरणी लक्ष द्यावे व मोठी दुर्घटना टाळण्यासाठी येथील विश्राम भवन सुरू करावे
अशी मागणी कोंढाळी सरपंच केशवराव धुर्वे उप सरपंच स्वप्निल व्यास ज्येष्ठ सदस्य संजय राऊत कमलेश गुप्ता, दुधाळा सरपंच प्रकाश गुजर, किशोर रेवतकर,
उपसरपंच हिंगणकर
नीतीन ठवळे,कौन्सिल फॉर ह्युमन राईट काटोल तालुकाध्यक्ष बबलू बिसेन, राहूल डोंगरे,रूपेश बुरडकर, यांनी केली आहे.