कोंढाळी येथील सर्व्हीस रोड ला तलावाचे स्वरूप

*केंद्रीय भू-पृष्ठ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंत्री नितीन गडकरी यांचे गृह जिल्ह्यातील सडक कंपन्यांची मनमा
नी*
कोंढाळी येथील सर्व्हीस रोड ला तलावाचे स्वरूप
वारंवार निवेदन देऊन ही सर्व्हीस रोड दुरूस्ती केली जात नाही
अखेर चक्का जाम आंदोलन करावेच लागणार काय?
कोंढाळी-वार्ताहर
नागपुर -अमरावती राष्ट्रीय महामार्गाचे कोंढाली – नागपुर च्या महामार्गाचे चौपदरी करणाचे कामात अनेक सेवा सुविधा पुरविण्यात अटलांटा मर्ग बांधकाम कंपनी कडून तृट्या असून याचा फटका कोंढाली व लगतचे गावातील नागरिकांना बसत आहे। केंद्रीय भू पृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे गृह जिल्ह्यातच महामार्ग बांधनीचे कामात नियमबाह्यतेचा फटका स्थानीय नागरिकांना बसत आहे.
कोंढाळी येथील उडान पुला लगत चे भागात विकासनगर सोनेगाव, तरोडा या गावांला जाण्यासाठी तर येथील *के जी टू पी जी*पर्यंत शैक्षणिक संस्था व विकासनगर चा भाग येतो , या करीता हा सर्हिस रोडची बांधणी मजबूत पाहिजे व सर्हिस रोड वर पाणी साचनार नाही याची दखल अटलांटा कडून होणे गरजेचे आहे. ड्रेनेज चे काम ही अपुर्ण आहे .
या भागातील राजकिय व सामाजिक संघटनाचे जन प्रतिनिधिंनी संबंधित बांधकाम अधिकारी व अटलांटा चे स्थानिय व्यवस्थाक यांना अनेक निवादने दिली तरी त्या निवेदनांना अक्षरशः केचारी टोपली दाखविली जात आहे.
आता या करिता आंदोलन हाच एकमेव एक पर्याय उरला आहे.
आता येथील नागरिकांना होनारा मानसिक, व शारीरिक त्रास व वाहनांची मोडतोड या सगळ्या चा अटलांटा कंपनी अंत पाहत आहे.
या प्रकरणी कोंढाळी चे सरपंच केशवराव धूर्वे तसेच उपसरपंच स्वप्निल सिंह व्यास यांनी अटलांटा कंपनी चे व्यवस्थापक एम जे बेग यांना येथील सर्व्हीस रोड चे दुरूस्ती चे काम लवकर पुर्ण करण्याची अखेर ची मागणी केली आहे। येत्या आठवड्याभरात कोंढाळी यथिल सर्व्हीस रोड चे काम पुर्ण केल्यास अखेर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती उपसरपंच स्वप्निल सिंह व्यास यांनी दिली आहे।
या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकार्यांनी ही अटलांटा कंपनी ला येथील सर्व्हीस रोड चे बांधकाम पुर्ण करण्या बाबद अनेकदा गोंडी व लेखी सुचना दिल्या तरी ही अटलांटा कंपनी कडून अजूनही येथील बांधकाम केले नसल्याची माहीती रा का चे आकाश गजबे , प्रशांत खंते नितीन ठवळे, यांनी दिली आहे। येथील सर्व्हीस रोड चे बांधकाम येत्या दोन दिवसात करून देतो असे वक्तव्य अटलांटा चे स्थानिय व्यवस्थापक एम जे बेग यांचे कडून दिले जात आहे। या दोन दिवसाला जवळ जवळ तिन महिने होत आहे, व पहिल्याच पावसात येथील सर्व्हीस रोड चे तलावात रूपांतर झाले आहे अशी माहीती सामाजिक कार्यकर्ता बबलू बिसेन यांनी दिली आहे.