कोंढाळी मधे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
Summary
कोंढाळी -वार्ताहर काटोल तालुक्यातील तालुक्यातील कोंढाळी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे प्रांगणात १६आगस्ट रोजी येथील लहू शक्ती फौंडेशनच्या सौजन्याने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फक्त दीड दिवस शाळेत जाऊन साहित्यरत्न […]

कोंढाळी -वार्ताहर
काटोल तालुक्यातील तालुक्यातील कोंढाळी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे प्रांगणात १६आगस्ट रोजी येथील लहू शक्ती फौंडेशनच्या सौजन्याने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फक्त दीड दिवस शाळेत जाऊन साहित्यरत्न लोकशाहीर झाले, अण्णाभाऊ साठे थोर समाजसुधारकांपैकी एक समाज सुधारक होते, अण्णाभाऊ साठे थोर समाजसुधारक होतेच त्याचबरोबर ते एक साहित्यक, कथालेखक, कांदबरीकर होते, त्यांनी कांदबरी, कथा, व्यतिरिक्त पोवाडे, लावणी, अशा विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केले त्यांनी लिहिलेल्या काही कादंबरीवर चित्रपट निर्माण झाले, त्यांनी लिहिलेल्या फकिरा या कादंबरीला राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट कांदबरी म्हणून गौरविण्यात आले.
कोंढाळी येथील लहू शक्ती युवा फाऊंडेशनचे वतीने थोर समाजसुधारक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रसंगी येथील शनिवार पेठ मधून १६ऑगस्ट चे सकाळी ११-०० भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ही शोभायात्रा शनिवार पेठ, ठवळे पुरा, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, टाका देवस्थान, राम मंदिर,बाजार चौक, एफ सी चौक,उमाठे नगर, दाणागंज, चांदणी चौक, बस स्टेशन, अम्मा का दरगाह या मार्गाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कार्यक्रमस्थळी पोहोचले, कार्यक्रमाचे उद्घाटक- नरेश अरसडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष -लाहनू इंगळे, प्रमुख पाहुणे -पुष्पाताई चाफले,अरूण उईके, केशवराव धुर्वे, स्वप्निल व्यास,योगेश चाफले, जावेद पठाण,जीवन गायकवाड, श्रीधरन सनेश्वर,गरीबा खोडके,व दशरथ तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंकज वाघोडे,राजू बावणे, बाबाराव ताकतोडे,प्रमोद ढोके,अरूण खोडके,संजय कठाळे, राजेश खडसे, तसेच महेश खोडके यांचा या प्रसंगी पाहूण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.अशा या थोर समाजसुधारक यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांनी उत्साहात व आनंदाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमानंतर भोजनदाना कार्यक्रम घेण्यात आला.
अशी माहिती स्थानिक लहू शक्ती फौंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.