कोंढाळी मधे प्राथमिक- माध्यमिक विद्यालय -कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई जयंती साजरी {कोंढाळी येथील ला.भु. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी} ————————– [राजेंद्र सिंह व्यास कला-वाणिज्य महाविद्यालयात ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न]
Summary
कोंढाळी प्रतिनिधी- दि.03/01/2023 रोज मंगळवार ला लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढाळी येथे ” सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन निमित्त ” प्राचार्य मा. गणेश शेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.शालिनी इंगळे होत्या, तर प्रमुख […]
कोंढाळी प्रतिनिधी- दि.03/01/2023 रोज मंगळवार ला लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढाळी येथे ” सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन निमित्त ” प्राचार्य मा. गणेश शेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.शालिनी इंगळे होत्या, तर प्रमुख उपस्थिती जेष्ठ पर्यवेक्षक सुधीर बूटे पर्यवेक्षक डॉ.निरंजन अंजनकर यांची होती .या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे ,गीत, वेशभूषा व रंजक नाटिका सादर केली. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक उत्सव समितीचे प्रमुख सुनील सोलव व संयोजन राहुल रक्षित, शैलेश चव्हाण,रवींद्र जायभाये ,रुपश्री चंदन,दर्शना फुले,कुसुम वरठी, किर्ती गांधी यांनी केले. अहवाल लेखन व छायाचित्रे राहुल रक्षित, शैलेश चव्हाण ध्वनिक्षेपण समीर लोणारे , शुभम राऊत यांनी केले.या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.संचालन कु. देवयानी वंजारी कु.चेतना नागपुरे व आभार कु. दिक्षा अवथळे,कु प्राची चिचखेडे यांनी केले.
*राजेंद्र सिंह व्यास महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती*
येथील आर बी व्यास कला वाणिज्य महाविद्यालयात क्रांति ज्योति सावित्री बई फुले यांच्या जयंती कार्यक्रम समन्न झाला.
कार्यक्रम के अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य डॉ राजू खरडे होते,
प्रा डॉ हरिदास लाड़के
प्रा डॉ राजू अंबाड़कर
प्रा डॉ गोपीचंद कठाने यांच्या प्रमुख
उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांनी क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले के कार्यांची माहिती दिली.
संचालन व आभार प्रदर्शन प्रा डॉ लोमेश्वर घागरे यांनी केले.प्रा डॉ प्रज्ञासा उपाध्याय,
ग्रंथपाल डॉ भोसे,
विजय परिहार,
महेश गोडबोले, गजानन दर्व्हेकर व विद्यार्थीगण उपस्थित होते.
