कोंढाळी भागात दुर्मिळ पेंगोलिन जप्त
Summary
कोंढाळी भागात दुर्मिळ पेंगोलिन जप्त आधुनिक बंदुका- काडतूसांसह जिवंत पेंगोलिन वन विभागाच्या ताब्यात कोंढाळी वनपरिक्षेत्राअंतरगत येणार्या फार्म हाउस वरून दुर्मिळ पेंगोलिन ही ताब्यात एका आरोपीला वन खात्याकडून अटक पेंगोलिन तस्करांचे शोधात वन विभाग कोंढाळी वार्ताहर-: जगाच्या पाठीवर वाघ हा सर्वात […]

कोंढाळी भागात दुर्मिळ पेंगोलिन जप्त
आधुनिक बंदुका- काडतूसांसह जिवंत पेंगोलिन वन विभागाच्या ताब्यात
कोंढाळी वनपरिक्षेत्राअंतरगत येणार्या फार्म हाउस वरून दुर्मिळ पेंगोलिन ही ताब्यात
एका आरोपीला वन खात्याकडून अटक पेंगोलिन तस्करांचे शोधात वन विभाग
कोंढाळी वार्ताहर-:
जगाच्या पाठीवर वाघ हा सर्वात जास्त महत्वपूर्ण प्राणी मानला जातो. पण त्या पाठोपाठ अनन्य महत्व औषधीसाठी उपयोगात येणारा पेंगोलिन नावाचा दुर्मिळ प्राणी प्रथमच कोंढाळी-कळमेश्वर वन परिक्षेत्रांच्या सीमे लगच्या कोंढाळी वनपरिक्षेत्रातील घोरपड वन हद्दितील एका शेतातील फार्महाऊस वर दिसला, त्याची शिकार पण करण्याच्या तयारीकरीता लागणारी अवजारे, आधुनिक बंदुका व बंदुकीच्या गोळ्या (गृह खात्यात वापरात असलेल्या बुलेट्स) ही वन विभागाकडून ताब्यात घेतल्यावर फार्महाऊस व शेतीचे मालकांना विचारपुस करण्यासाठी वन संम्मान बजावल्याचे सांगण्यात आले आहे. या मुळे या भागातील फार्महाऊस संचालकामधे खळबळ उडाली आहे।
नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्ग वरिल बाजारगांव लगतच्या ४0 कि. मी. अंतरावरील कोंढाळी वनपरिक्षेत्र अंतरगत येणार्या घोरपड बीट मधील जंगलालगतच्या एका शेतातून पेंगोलिन नावाच्या आणि वन विभागाने शेड्युल-1 म्हणजे वाघ-बिबटच्या समकक्ष समजल्या जाणार्या पेंगोलिन प्राण्याला येथील महिला शेतकरी विलोचना गावंडे यांच्या कोतवालबरडी उपवनक्षेत्र घोरपड गावच्या शेतातून जीवंत पेंगोलिन जप्त केले. कारवाई वन विभागाकडून मुख्य वन संरक्षक रंगनाथ नाईकडे, उप वन संरक्षक डाॅ.भारत सिंह हाडा, उपविभागीय वन अधिकारी प्रज्योत पालवे ,नरेश चंदावार, तसेच वन परिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते व कळमेश्वर चे वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नौवकरकर यांच्या मार्गदर्शनात 24तासात आरोपींचा शोध घेऊन आरोपी रोशन बापूराव कुडे मु-धुरखेडा जि नागपुर याला चौकशी साठी ताब्यात घेतले तसेच आरोपी कडून टिनाचे कोठीत ठेवलेले पेंगोलिन तसेच प्लास्टिक चे कैरेट मधे जंगली प्राणी ससा तसेच फार्महाऊस (घराची)तपासनी केली असता, यात मास कापण्याचे हत्यार सोबतच बंदुका(2नग), बंदूकीचे काडतूस 17नग, पिस्टल चे काडतूस 14नग, असा मुद्देमाल जप्त केला असून दुर्लभ प्रजाति चे जिवंत पेंगोलिन व ससा ताब्यात घेतला आहे.आर एफ ओ निशिकांत कापगते व वन विभागाचे कर्मचारी चौकशी करुन इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
ताब्यात घेतलेल्या पेंगोलिन ची किंमत व शस्त्रांची किंमत कळू शकली नाही। सोबतच जंगल प्रणव भागात बंदुका व पिस्टल 31नग काडतूस व मास कापण्यांची अवजारे शेतातील फार्महाऊस (घरातून)जप्त होणे बरेच काही सांगून जाते, तो तपासाचा भाग वन विभागाचा आहे । तसेच पिस्टल चे काडतूस ही गंभीर चौकशी चा विषय आहे।
फार्म हाउसेस बनले तस्करी व अय्याशीचे अड्डे
नागपुर -अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाली-कळमेश्वर-हिंगणा वन परिक्षेत्रातील तसेच तिन्ही पोलीस स्टेशन हद्दितील अनेक फार्महाऊस वन तस्करी तसेच आय्याशीचे अड्डे नावरूपाला सामोर येत आहेत।
या दोन महीन्यात राष्ट्रीय महामार्गा लगच्या फार्महाऊस वर एक बिबटाची शिकार करनार्या टोळीला जेरेबंद केले होते. तर 31जुलै रोजी जिवंत पेंगोलिन व आधुनिक अवजारे जप्त करण्यात आले आहे। तर याच परिसरातील काही फार्महाऊस व रिसोर्ट वर जुगार व अय्याशी करणार्यावर कार्यवाही करण्यात आली आहे । नागपुर लगतच्या नागपुर ग्रामीण,हिंगणा, कोंढाळी,कळमेश्वर,तसेच वर्धा जिल्यातील कारंजा व सेलू पो स्टे हद्दितील जंगल प्रवण भागात अनेक बडे राजकिय नेते, आयकर, उत्पादन शुल्क, पोलीस, राजस्व व वन विभागाचे सेवानिवृत अधिकारी तसेच उद्योगपतींचे ही फार्महाऊस असल्याने वन तसेच गृह विभाग या भागातील फार्महाऊस तपसण्यांची साधक तसदी सुद्धा घेत नाहीत.
या करिता नागपुर वन विभाग व नागपुर पोलीस अधिक्षक यांचे कडून येथील फार्महाऊसेची सततची तपासनी ची गरज असल्याचे सांगित ले जात आहे.