कोंढाळी बस स्थानक गेले खड्ड्यात प्रवासी भाडे तर घेता सोई सवलती चे काय? एस टी महामंडळाचे अधिकारी कुंभकर्णि झोपेत!!!!!
Summary
काटोल/कोंढाळी-प्रतिनीधी राज्यात प्रवासी वाहतूकीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्रवासी वाहतूकीसाठी परवानगी आहे. त्या नुसार स्थापित एस टी महामंडळ ठरवून दिलेल्या प्रवासी वाहतूक भाडे घेऊन प्रवाशांना मेट्रो सीटी ते दर्याखोर्यातील प्रवासी वाहतूक करत आहे. यात ही राज्य सरकार ने सामाजाती […]
काटोल/कोंढाळी-प्रतिनीधी
राज्यात प्रवासी वाहतूकीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्रवासी वाहतूकीसाठी परवानगी आहे. त्या नुसार स्थापित एस टी महामंडळ ठरवून दिलेल्या प्रवासी वाहतूक भाडे घेऊन प्रवाशांना मेट्रो सीटी ते दर्याखोर्यातील प्रवासी वाहतूक करत आहे.
यात ही राज्य सरकार ने सामाजाती काही घटकांना १००टक्के, ६७.३३%,५०%४५%२५%सवलती जाहीर केल्या आहेत. अर्थात या जाहिर सवलतीची प्रतिपुर्ती सरकार करत असतं (उशीरा कां होईना),
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांकडून प्रवासी भाडे घेते मात्र सोई सवलती चे नांवखाली काय?
बस स्थानकावर नियमानुसार स्वच्छतेचा अभाव, महिला/पुरूषांची स्वच्छतागृत दुर्गंधी, बस स्थानकावर पडलेले खड्डे ह्यावर कधीतरी विचार होनार की नाही.
खरे तर या बाबतीत बोलायचे च झाल्यास कुणाशी बोलावे!
उदाहरणार्थ – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नागपूर विभागातील कोंढाळी बस स्थानक हे प्रवासी वाहतूकीचे बडे प्रवासी वाहतूक नियंत्रण केंद्र आहे. येथून दररोज २४०प्रवासी फेर्या केल्या जातात. (अनेक प्रवासी बसेस चे चालकांचे मनमानीपणा मुळे अनेक बसेस नोंद घेता उडापूलावरून निघून जातात ते वेगळे.)
विद्यार्थी/विद्यार्थीनी प्रवासी पास ची संख्या १६००चे जवळपास आहे.
तसेच येथील बस स्थानकावरील व्यावसायीक भाडे सुद्धा मिळते मात्र येथील स्वच्छता संबंधित सफाई कंत्राटदार योग्य ती सफाई करण्यात कमी पडत आहे.
या बाबतीत कोंढाळी बस स्थानकावर पहिली पाळी सकाळी सहा ते दुपारी दोन व दुसरी पाळी दुपारी दोन ते रात्री दहा अश्या दोन पाळीत दोन सफाई कामगारांची नियुक्ती असने अत्यंत गरजेचे आहे.
येथील वाहन तळावरील पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे डांबरीकरणावर परिणाम होऊन मो मोठे खड्ये पडले आहेत.
आता पडलेले खड्डे पावसाळ्यानंतरच दुरूस्त होतील , हे! उत्तर अपेक्षित असतांनाच सध्या स्थितीत या मोठ्या जीव घेणे खड्डे बुजविण्यासाठी काही तरी उपाय योजना करण्यात यावी.
खरे तर या प्रकरणी स्थानिक जनप्रतिनिधीनीं संबंधीत कार्यालयामार्फत आवश्यक त्या सोयी सवलती उपलब्ध करून घेणे गरजेचे असतांना कुणी ही लक्ष देण्यास तयार नाही. जि प सदस्य सलील देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे येथील वाहनतळावर डांबरीकरण झाले. तसेच कोंढाळी बस स्थानकावर अद्यावत सोई सवलती साठी तीन कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे मात्र सरकार कडून हा नीधी निर्गमित करण्यात आला नाही .
आता येथील खड्डे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बांधकाम विभाग दुरूस्ती करणार की एस टी प्रशान नाहक एखादे बडे आंदोलनाचे प्रतिक्षेत आहे हे कळायला मार्ग नाही.
खरे तर !!
कोंढाळी बस स्थानकावरील दुरावस्थेची माहिती एस टी महामंडळाच्या बहूतेक सर्वच अधिकाऱ्यांना समाज माध्यमातून (वाटसाप द्वारा, ई मेल द्वारे) दिली आहे.
तसेच आमदार, खासदार, पालक मंत्री, यांचे कार्यालयीन अधिकारी स्विय सहायक यांनाही पाठविले आहे.