कोंढाळी बस स्थानकावर चिडीमारा हैदोस विद्यार्थीनीं च्या सुरक्षे करिता बसस्थानकावर पोलीस गस्ती ची मागणी
Summary
कोंढाळी-वार्ताहर महाविद्यालयीन व शाळेकरी विद्यार्थ्यींच्या सुरक्षे करीता कोंढाळी पोलीस स्टेशन तर्फे सुरक्षा गस्त सुरू केली जावी अशी मागणी स्थानिक व ग्रामीण भागातील पालकांकडून व स्थानिक महिला शांतता कमेटी कडून करण्यात येत आहे. कोंढाळी लगतच्या ४१गावचे अंदाज २२००तरकोंढाळी नगरीतील १२००च्या लगत […]

कोंढाळी-वार्ताहर
महाविद्यालयीन व शाळेकरी विद्यार्थ्यींच्या सुरक्षे करीता कोंढाळी पोलीस स्टेशन तर्फे सुरक्षा गस्त सुरू केली जावी अशी मागणी स्थानिक व ग्रामीण भागातील पालकांकडून व स्थानिक महिला शांतता कमेटी कडून करण्यात येत आहे.
कोंढाळी लगतच्या ४१गावचे अंदाज २२००तरकोंढाळी नगरीतील १२००च्या लगत एकूण ३४००च्या लगभग शाळा-महाविलयीन विद्यार्थी येथील शाळांमध्ये प्रवेश घेत शिक्षण घेतात. यात १६०० विद्यार्थीनी आहेत.
येथील सकाळी ७-३० व११-१५ला शाळा महाविद्यालय सुरू होते तर सकाळी सुरू होणारी माध्यमिक शाळा ११-१५ ला सुटते, तर ११-३० ला सुरू होणारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सायंकाळी ४-४५ व ५-१५ वाजता सुटते. ग्रामीण भागातील विद्यार्थीनीं आप आपल्या गावाला जाण्यासाठी बस स्थानकावर आल्यावर काही युवक बस स्थानकावर तसेच आवारात महिला पुरूष प्रसाधनगृहा लगत बसून विद्यार्थीनींना त्रास देण्याच्या घटना घडत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यीनीं हा त्रास सहन करतात पण तक्रार करत नाहीत.
या करीता आता पालकांनी कोंढाळी चे ठाणेदार पंकज वाघोड यांच्या कडे ११–००ते१२व सायंकाळी ४-१५ते ६-३०वाजेपर्यंत नियमित पोलीसांची फिरती गस्त ठेवावी हि मागणी केली आहे.
शाळेकरी विद्यार्थीनी ची तक्रार- पोस्पो दाखल
शनिवार 04फेब्रूवारी रोजी कोंढाळी येथील बस स्थानकावर एका अल्पवयीन शाळेकरी विद्यार्थ्यांनी ची चंदनपार्डी गावच्या युवकाने छेड काढली, या घटनेची तक्रार शाळकरी विद्यार्थीनी़ं ने कोंढाळी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या प्रकरणी ठाणेदार पंकज वाघोडे, उपनिरीक्षक मिना बारंगे यांनी घटनेची दखल घेत घटना स्थळ पंचनामा करून छोड काढणार्या युवका विरुद्ध महिला छेड काढणे व पोस्पो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप निरीक्षक मीना बारंगे पुढिल तपास करत आहे.