कोंढाळी बस स्थानकाच्या महिला स्वच्छतागृहासमोर दुचाकीची पार्किंग एड-ऋणूजा गायकवाड
Summary
कोंढाळी-वार्ताहर जास्तीत जास्त प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी कोंढाळी बसस्थानक नागपूर विभागातील सर्वात वर्दळीचे प्रवासी वाहतूक केंद्रआहे. यासोबतच राष्ट्रीय महामार्गाने नागपूर-अमरावती-अकोला व पुढे जाण्यासाठी आंतर जिल्हा बससेवा सुरू आहे. या वाहतूक केंद्रा वरील महीला-पुरुष स्वच्छतागृहांची स्वच्छता नीट होत नाही. तसेच येथील […]

कोंढाळी-वार्ताहर
जास्तीत जास्त प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी कोंढाळी बसस्थानक नागपूर विभागातील सर्वात वर्दळीचे प्रवासी वाहतूक केंद्रआहे. यासोबतच राष्ट्रीय महामार्गाने नागपूर-अमरावती-अकोला व पुढे जाण्यासाठी आंतर जिल्हा बससेवा सुरू आहे. या वाहतूक केंद्रा वरील महीला-पुरुष स्वच्छतागृहांची स्वच्छता नीट होत नाही. तसेच येथील बसस्थानकाच्या महिला स्वच्छता गृहाचे ठिक सामोरच दुचाकींचे पार्किंग केले जाते.या मुळे महीलांना अनेक अडचणीला सामोरी जावे लागते, सोबतच येथील महिला स्वच्छता गृहा सामोरील दुचाकी पार्किंग मानवी सेवेच्या नियमांचे उल्लंघन करणारी ठरत आहे.
या करीता कोंढाळी येथील महिला स्वच्छता गृहासामोरील दुचाकी पार्किंग अन्यत्र हटविले जावे व या पुढे ही येथे दुचाकी पार्किंग होणार नाही याबाबत योग्य त्या उपाय योजना करावी.
अशी मागणी कोंढाळीचे वकील एड-ऋणुजा गायकवाड यांनी दिली आहे. काटोल आगार व्यवस्थापक, विभाग नियंत्रक यांना या विषयाची माहिती देण्याबरोबरच महिला स्वच्छता गृहासमोरील दुचाकी पार्किंग विनाविलंब हटविण्याची मागणी केली.