कोंढाळी बस स्थानकाचे प्रवासी उन्हात एस टी महामंडळाचे चे दुर्लक्ष
Summary
कोंढाळी- नागपूर -अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53/06 वरिल जिल्ह्यातील प्रवाशांच्या अति वर्दळीच्या कोंढाळी बस स्थानकाचे अद्यावतीकरणाची काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे दैवत म्हणजे प्रवासी, या प्रवाश्यांची रखरखत्या ऊन्हात लाहि लाही होत आहे. महाराष्ट्र राज्य […]
कोंढाळी-
नागपूर -अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53/06 वरिल जिल्ह्यातील प्रवाशांच्या अति वर्दळीच्या कोंढाळी बस स्थानकाचे अद्यावतीकरणाची काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे दैवत म्हणजे प्रवासी, या प्रवाश्यांची रखरखत्या ऊन्हात लाहि लाही होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील बांधकाम विभाग व विभागीय अधिकारी यांनी येथील प्रवाशांची पिण्यासाठी पाणी व उन्हासाठी नेट बांधायला पाहिजे होती. या बाबतीत स्थानिक वृत्तपत्रात बातम्यांचे माध्यमातून जन आवाहनही करण्यात आले होते. मात्र एस टी महामंडळाच्या कोणत्याही अधिकार्यांनी या प्रकरणी दखल घेतली नाही.
खरेतर या बाबतीत कोंढाळी भागातील राजकीय सत्ता पक्षाचे किंवा अन्य पक्षांचे नेते यांनी या प्रकरणी दखल घेऊन आमदार/खासदार यांचे मार्फत कोंढाळी येथील बस स्थानकाचे अद्यावतीकरणाची कामाला गती देण्यासाठी सुचनावजा निर्देश देण्यासाठी संपर्क करणे गरजेचे आहे. एस टी महामंडळाच्या अधिकार्यांनी हे बांधकाम वेळेत पूर्ण करून घेणे अपेक्षित आहे मात्र , ते होतांना दिसत नाही.
कोंढाळी भागातील समस्या सोडविण्यासाठी आता आमदारांनी विशेष लक्ष द्यावे. तेंव्हाच कोंढाळी बस स्थानकाचे अद्यावतीकरणाची कामाला गती मिळेल .
कोंढाळी बस स्थानकाचे अद्यावतीकरणाची कामाला माजी मंत्री अनिल देशमुख यांनी तीन कोटींची मंजुरी मिळवून दिली होती.त्या निधीलानिर्गमित करण्यासाठी सलील देशमुख यांनी प्रयत्न केले. आता या कामाला गती देऊन प्रवाशांना दिलासा व बस स्थानकाचे अद्यावतीकरणाची काम पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार चरणसिंग ठाकूर यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. या साठी कोंढाळी भागातील सर्व पक्षीय राजकारणी व्यक्तींनी एकजूटता दाखवावी. आताही कोंढाळी बस स्थानकाचे सांडपाणी व्यवस्थापनास कटोल रोड वर नालीची गरज आहे. ती येत्या पावसाळ्यापुर्वी. होणे गरजेचे आहे. तरी या महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष देण्याची गरज आहे.
