कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली नवीन १०२ कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली नवीन रूग्णवाहिका
Summary
कोंढाळी -वार्ताहर नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत राज्यातील प्राथमिक आरोग्य सेवाकेंद्राअंतरगत सर्वसामान्य गरजांसाठी102क्र रुग्णवाहिका सेवा देण्यात येते. याशिवाय गरोदर महिला आणि बालकांच्या उपचारासाठीही या सेवेचा वापर करून . जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत, पात्र रूग्णाची हॉस्पिटलमध्ये मोफत डिलिव्हरी, दुसर्या हॉस्पिटलमध्ये रेफर केल्यावर […]
कोंढाळी -वार्ताहर
नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत राज्यातील प्राथमिक आरोग्य सेवाकेंद्राअंतरगत
सर्वसामान्य गरजांसाठी102क्र रुग्णवाहिका सेवा देण्यात येते. याशिवाय गरोदर महिला आणि बालकांच्या उपचारासाठीही या सेवेचा वापर करून . जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत, पात्र रूग्णाची हॉस्पिटलमध्ये मोफत डिलिव्हरी, दुसर्या हॉस्पिटलमध्ये रेफर केल्यावर आणि मुलाला आणि आईला मोफत घरी नेण्याची सुविधा देण्यासाठी राज्य आरोग्य सेवे च्या माध्यमातून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात 102क्र. रूग्णवाहिक मंजुर केल्या जाते. नागपूर जिल्ह्यातील अतिसंवेदनशील म्हणून गणल्या जाणाऱ्या कोंढाळी प्राथमिक आरोग्य सेवाकेंद्राअंतरगत रूण्गांच्या सेवेत असलेली 102क्रं रूग्णवाहिकेचा सेवाकाळ समाप्त झाल्यावर येथील रूग्णांना जलालखेडा येथील रूग्णवाहीकेची सेवा घ्यावी लागत असे. या करिता कोंढाळी प्राथमिक आरोग्य सेवा समिती च्या अध्यक्ष व जि प सदस्या पुष्पाताई चाफले, सह अध्यक्ष व जि प सदस्य सलील देशमुख कोंढाळी सरपंच केशवराव धुर्वे व आरोग्य सेवा समिती चे सर्व सदस्यांनी कोंढाळी प्राथमिक आरोग्य सेवाकेंद्राकरिता आरोग्य विभागाकडे नवीन 102 क्र रूग्ण वाहिकेची मागणी करण्यात आली होती . या मागणीला नागपूर जि प अध्यक्ष, उपाध्यक्ष, आरोग्य सभापती यांनी मंजुरी दिली होती . अखेर पाच सप्टेंबरला कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रा करिता माजी मंत्री सुनिल केदार यांचे उपस्थितीत जि प अध्यक्ष मुक्ताताई कोकर्डे, उपाध्यक्षा कुंदाताई राऊत, जि प नागपूर चे सर्व विषय समिती चे सभापती,व जि प सी ई ओ सौम्या शर्मा यांनी कोंढाळी जि प सदस्या पुष्पाताई चाफले,जि प सदस्य सलील देशमुख यांच्या उपस्थितीत रूग्णवाहीकेची चाबी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ पुष्पक खवशी व वाहनचालक नारायण जुराहे यांना सुपुर्द केली.
या प्रसंगी कोंढाळी चे पंचायत समिती सदस्य अरुण उइके,सरपंच केशवराव धुर्वे उपसरपंच स्वप्निल व्यास ज्येष्ठ सदस्य संजय राऊत, प्रमोद चाफले,विनोद माकोडे,पदम डेहणकर नितीन ठवळे,आकाश गजबे, रणजीत गायकवाड, प्रशांत खंते,रमण ठाकरे उपस्थित होते.