कोंढाळी पोलीस स्टेशन तर्फे गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Summary
कोंढाळी-वार्ताहर कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला 04 ऑक्टोबर रोजी सकाळी 11-00 वाजता कोंढाळी पोलीस स्टेशनच्या परेड ग्राऊंडच्या मैदानावर नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या नेतृत्वाखाली काटोल उपविभागीय अधिकारी श्रीकांत मा. उंबरकर, काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, पुष्पा […]
कोंढाळी-वार्ताहर
कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला 04 ऑक्टोबर रोजी सकाळी 11-00 वाजता कोंढाळी पोलीस स्टेशनच्या परेड ग्राऊंडच्या मैदानावर नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या नेतृत्वाखाली काटोल उपविभागीय अधिकारी श्रीकांत मा. उंबरकर, काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, पुष्पा ताई चाफले, जिल्हा परिषदेच्या कोंढाळी जि.प. सर्कल सदस्य,सरपंच केशवराव धुर्वे, कोंढाळीचे उपसरपंच स्वप्नील सिंह व्यास, पंचायत समितीचे सदस्य अरुण उईके, पं स लताताई धारपुरे, माजी सभापती शेषराव चाफले, आरोग्य अधिकारी अनिल मडावी, केंद्रप्रमुख नीळकंठराव लोहकरे, नंदकिशोर हिवसे उपस्थित होते.या प्रसंगी कोंढाळी व लगतच्या माध्यमिक शाळेतील आर्थिक दुर्बल घटकातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस अधिकारी विजयकुमार मगर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, तुम्ही देशाचे भविष्य आहात आणि देशाचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी तुमच्या उच्च शिक्षणात महत्वाची भूमिका बजावावी लागेल.
तसेच पोलीस अधीक्षक यांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागपूर जिल्हा पोलिसांनी सामाजिक दायित्व अंतर्गत पोलिसांसाठी शाळा-तर शाळेसाठी पोलिस, तसेच पापा हेल्मेट घाला या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पोहोचून 75 हजारांहून अधिक पोलीस विभागातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.त्याचबरोबर ग्रामीण भागातील आदिवासीबहुल भागातील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त250 सायकलींचे वातावरण तयार करण्यात आले.
आज 04 ऑगस्ट रोजी कोंढाळीचे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीतील आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना अत्यावश्यक शालेय साहित्याचे वाटप करून पोलिसांच्या संवेदनशीलतेचे उदाहरण दिले.
यावेळी काटोल उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते दुर्गाप्रसाद पांडे, पुरुषोत्तम हगवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
*गुणवंत विद्यार्थी नी चा सत्कार*
यावेळी पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर यांचे हस्ते विशाखा ज्ञानेश्वर महाल्ले या हुशार विद्यार्थिनीचा व उपस्थित सर्व अधिकारी व पदाधिकारी अधिकारी यांनी गौरव केला.
कार्यक्रमाप्रसंगी ब्रजेश तिवारी, सुधीर बुटे, बाबा शेख, संजय राऊत, प्रमोद चाफले, बलकिसन पालीवाल, रणजित गायकवाड, कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गतचे सर्व पोलीस पटेल, उपनिरीक्षक देवेंद्र सोनावले, पो उ नि राम ढगे, पो उ नि मीना बारंगे,यांच्या उपस्थितीत संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व कोंढाळी पोलिस स्टेशनचे सर्व एएस आय, पुरुष व महिला पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार पंकज वाघोडे, संचलन उपनिरीक्षक मिना बरंगे यांनी केले तर आभार देवेंद्र सोनावले यांनी मानले.
विज्ञान प्रदर्शनी ला भेट
पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव, सरपंच केशवराव धुर्वे उपसरपंच स्वप्नीलसिंग व्यास,ब्रजेश तिवारी यांनी येथील लखोटिया भुतडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे सादरीकरण करणाची पाहणी केली व भावी वैज्ञानिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी उपाध्यक्षा रेखाताई राठी, प्राचार्य गणेशराव सेंबेकर, उपप्राचार्या शालिनी इंगळे, पर्यवेक्षक सुधीर बुटे, तसेच विज्ञान प्रदर्शनाचे प्रशिक्षक व निरीक्षक उपस्थित होते.