BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत बालविवाह रोखण्यात यश @बाल संरक्षण पथकाची कारवाई @कुटुंबाने दाखविला खोटा वयाचा पुरावा @शेवटी सर्वांना पोलीस स्टेशनच्या आवारात बालविवाह प्रतिबंधाबाबत शपथ देण्यात आली @ पोलिसांनी बजावली लॉन व्यवस्थापकां सह अन्य सर्वांना नोटीस

Summary

दिनांक 26-03-25 रोजी महिला बाल विकास विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर तक्रार प्राप्त झाली की एका सोळा वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार आहे माहिती प्राप्त होताच तात्काळ बाल संरक्षण पथकाने बालिकेच्या घरी भेट देऊन बहालव्या प्रतिबंध अधिनियम 2006 नवे कार्यवाही करून […]

दिनांक 26-03-25 रोजी महिला बाल विकास विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर तक्रार प्राप्त झाली की एका सोळा वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार आहे माहिती प्राप्त होताच तात्काळ बाल संरक्षण पथकाने बालिकेच्या घरी भेट देऊन बहालव्या प्रतिबंध अधिनियम 2006 नवे कार्यवाही करून बालविवाह रोखला

कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीकांत लॉन्स सभागृह येथे 27/03/25 रोजी एका सोळा वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार आहे याची माहिती प्राप्त होताच बाल संरक्षण पथकाने याची माहिती कोंढाळी पोलीस स्टेशन यांना दिली कोंढाळी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने पथक श्रीकांत लॉन येथे गेले व तेथे लग्न होणाऱ्या रजिस्टरच्या नोंदी तपासल्या यामध्ये प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने लग्न होण्याबाबतची खात्री पटली त्यानुसार पथक पोलिसांच्या सहकार्याने बालिकेच्या घरी जाऊन माहिती घेतली सुरुवातीला कुटुंबातील लोकांनी व नातेवाईकांनी उडवा ओळीची उत्तरे दिली व नंतर एक दाखला दिला दाखल्यामध्ये मुलीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त दाखवण्यात आलं होतं परंतु सदर दाखला खोटा असल्याची, व मुलीच्या शाळेतील नोंदीनुसार, मुलीचं वय 16 वर्ष असल्याची खात्री पटल्यानंतर कुटुंबाला पालिकेचे लग्न करण्याबाबतचा जाब विचारण्यात आला, व सद्य सदर बाबतीत पोलिसांना कारवाई करण्याबाबत सांगण्यात आले, मुलीचे वय जेव्हा पर्यंत अठरा वर्ष होत नाही मुलाचे वय 21 वर्षे होत नाही तेव्हापर्यंत लग्न करता येत नाही, असे बंद पत्र लिहून घेण्यात आले, व मुलीचे समुपदेशन करण्यात आले, ज्या बालिकेचे बालविवाह होणार होता, त्या पिढीत बालकाला तात्काळ बालकल्याण समिती समक्ष हजर करण्यात यावे, असे पोलिसांना पत्र देण्यात आले देण्यात आले याबाबतची कारवाई पोलीस स्टेशनमध्ये होत असताना समाजातील अनेक नागरिक तेथे जमा झालेत सर्वांचे समर्थन करण्यात आले व पोलीस स्टेशन हद्दीतच उपस्थित नागरिकांना बालविवाह करणार नाही याबाबतची पथकाकडून शपथ देण्यात आली सदरची कारवाई जिल्हा महिला बालविकास अधिकारी रणजीत कुर्रे यांच्या मार्गदर्शनात, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, मुश्ताक पठाण, चाइल्ड लाईन प्रतिनिधी पूजा कांबळे, जी एस एम टी एनजीओ प्रियंका बागडे पोलीस निरीक्षक राजकुमार त्रिपाठी, बालविकास प्रकल्प अधिकारी सतीश तट्टे , पर्यवेक्षिका श्रीमती बोंबाडे ग्रामसेविका जया पाटील. सरपंच किस्मत चव्हाण .पोलीस पाटील भोंगळे, ए एस आय राजकुमार कोल्हे,महिला पो. शि निशा पारधी संरक्षण अधिकारी रोंगरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *