कोंढाळी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी भाजपच्या हेमलता पालीवाल विजयी भाजपला १२, काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीला ६ मते; स्वप्नील व्यास व शेख गफ्फार नामनिर्देशित नगरसेवक
Summary
कोंढाळी | प्रतिनिधी नवगठित कोंढाळी नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष पदासाठी बुधवार, १४ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हेमलता बालकिसन पालीवाल यांना१२ तर काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस यांना (शरद पवार) आघाडीचे उमेदवार शेख सनोवर मोहम्मद राजीक यांना ०६ मते मिळाली. ही निवडणूक […]
कोंढाळी | प्रतिनिधी
नवगठित कोंढाळी नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष पदासाठी बुधवार, १४ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हेमलता बालकिसन पालीवाल यांना१२ तर काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस यांना (शरद पवार) आघाडीचे उमेदवार शेख सनोवर मोहम्मद राजीक यांना ०६ मते मिळाली.
ही निवडणूक नगरपंचायतीची पहिली अधिकृत सभा म्हणून नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी योगेश शेषराव चाफले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे उपस्थित होते.
उपाध्यक्ष पदासाठी भाजपकडून हेमलता पालीवाल तर काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीकडून शेख सनोवर राजीक यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दुपारी १.४५ वाजेपर्यंत कोणताही उमेदवार अर्ज मागे न घेतल्याने हात उंच करून मतदान घेण्यात आले.
हेमलता पालीवाल (भाजप) – १२ मते
(भाजपचे ९, अपक्ष २ व नगराध्यक्षांचे १ मत)
शेख सनोवर राजीक (काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडी) – ६ मते
(राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ४ व काँग्रेस २)
यानंतर पीठासीन अधिकारी योगेश चाफले यांनी हेमलता पालीवाल यांना उपाध्यक्ष म्हणून विजयी घोषित केले.
*नामनिर्देशित नगरसेवकांची घोषणा*
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षांनी नगरपंचायतीतील सर्व १७ नगरसेवक, उपाध्यक्ष, दोन्ही गटनेते व प्रतोदांचे आभार मानले. त्यानंतर कोंढाळी नगरपंचायतीच्या नामनिर्देशित नगरसेवक पदासाठी—
भाजपकडून : शेख गफ्फार शेख भुरू
काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीकडून : स्वप्नील सुरेंद्रसिंह व्यास
यांची नावे अधिकृतरीत्या घोषित करण्यात आली.
खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुक प्रक्रिया
मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे यांच्या उपस्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या व शांत वातावरणात पार पडली. निवडणुकीनंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
नागरिकांनी व्यक्त केला आनंद
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याने स्थानिक नागरिकांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष हेमलता पालीवाल तसेच नामनिर्देशित नगरसेवक स्वप्निल व्यास व शेख गफ्फार सह सर्व उपस्थित नगर सेवकांना तिळगुळ वाटून अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. या निवडणुकीत कोंढाळी नगर पंचायती चे निवडणूकित १)योगेश शेषराव चाफले नगराध्यक्ष व भा ज पा गट नेता,२)विशाल दिगांबर सावरकर ३) कमल सुरेश इरपाते४) गौरव गंगाधर इरखेडे५). कविता विलास झाडे,६) सोनल प्रमोद चाफले,७)हेमलता बालकिसन पालीवाल प्रमोत तथा नवनिर्वाचित उपाध्यक्ष,८)मुन्नासिंग चंद्रपालसिंग सेंगर -उप गट नेता (भाजपा),९) सुषमा गजानन खोडणकर,१०) प्रिया हेमराज पैठे,११), आम्रपाली अतुल नारनवरे,१२)प्रज्वल नंदकिशोर धोटे- गट नेता ( राका +कांग्रेस आघाड़ी),१३)शेख सनोबर मोहम्मदराजीक,१४) राहुल कृष्णराव नासरे -प्रतोद (राका-कांग्रेस),१५) विनोद शालिक माकोडे उप गट -नेता (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस+ राकांपा श प),१६) बंदेरहमान शेख वहाब शेख,१७)चंद्रकला माधवराव इमाने१८, अंकित बालकिसन पालीवाल यांनी उपाध्यक्ष पदाचे निवडनूकीत सहभाग घेतला।
