BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळी – काटोल – सावरगाव राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग होणार “ऑरेंज बेल्ट महामार्ग” प्रस्तावालाही लवकरच मंजुरी – आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या मागणीनंतर केंद्रीय भू पृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरींचा सकारात्मक निर्णय

Summary

कोंढाळी//काटोल (प्रतिनिधी): कोंढाळी – काटोल – सावरगाव मार्गासह कारंजा – लोहारी सावंगा – भारसिंगी – खरसोली – नरखेड या भागातील राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळणार असून, यासंदर्भातील प्रस्तावाला लवकरच केंद्र सरकारकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते परिवहन व […]

कोंढाळी//काटोल (प्रतिनिधी):
कोंढाळी – काटोल – सावरगाव मार्गासह कारंजा – लोहारी सावंगा – भारसिंगी – खरसोली – नरखेड या भागातील राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळणार असून, यासंदर्भातील प्रस्तावाला लवकरच केंद्र सरकारकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्राचे राजस्व मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे उपस्थितीत झालेल्या बैठकीत, काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी ही महत्त्वपूर्ण मागणी मांडली होती. त्यांच्या या प्रस्तावास केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

वाहतुकीचा अडथळा आणि अपघातांच्या घटनांवर तोडगा

कोंढाळी – काटोल – सावरगाव मार्ग हा राज्य महामार्ग क्रमांक 247 चा भाग असून, या रस्त्यावर दरवर्षी 40 ते 50 लोकांचा अपघाती मृत्यू होतो. हा मार्ग हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधून येणाऱ्या वाहनांची प्रमुख वाहतूक मार्ग असल्याने येथे कायम अपघात व वाहतूक कोंडी होते.

या समस्येवर उपाय म्हणून या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याची मागणी करण्यात आली, जेणेकरून रस्त्याची गुणवत्ता वाढेल, अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि वाहतूक सुरळीत होईल.

संत्रा उत्पादकांसाठी “ऑरेंज बेल्ट महामार्ग”

काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्यासाठी “ऑरेंज बेल्ट महामार्ग” हा स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
कारंजा – लोहारी सावंगा – भारसिंगी – खरसोली – नरखेड ते मध्यप्रदेश सीमा असा हा मार्ग असणार आहे. या महामार्गामुळे फळे, भाजीपाला, अन्नधान्य आदी शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार आहे.

*दिल्ली येथे होणार निर्णयाची अंतिम बैठक*

या दोन्ही प्रस्तावांना अंतिम मंजुरी देण्यासाठी दिल्ली येथे विशेष बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार चरणसिंग ठाकूर यांचे कडून देण्यात आली आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार चरणसिंग ठाकूर यांची उपस्थिती असणार आहे.


या बाबतीत आमदार चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले की
या प्रस्तावांच्या अंमलबजावणीनंतर काटोल व नरखेड तालुक्यातील जनतेला वाहतूक, शेती व व्यापाराच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे. हा निर्णय संत्रा पट्ट्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *