नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोंढाळीत महामानवाला विनम्र अभिवादन 170विद्यार्थ्यांनी सामुहिक पठण केले. अभिवादन रैली काढण्यात आली

Summary

कोंढाळी-वार्ताहर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोंढाळीतील शैक्षणिक संस्था,सह विविध […]

कोंढाळी-वार्ताहर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोंढाळीतील शैक्षणिक संस्था,सह विविध संस्था, संघटनांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. येथील लाखोटिया भुतडा हायस्कूल च्या वतीने 170विद्यार्थ्यांनी आठ तास सामुहिक अभ्यास करून अभिवादन केले, त्याच प्रमाणे येथील आर बी व्यास महाविद्यालय, जि प प्राथमिक शाळा, ग्राम पंचायत कोंढाळी , राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय,राजनिता निवास, व् येथील प्राचीन टाकेश्वर मठा चे महंत सुरजानंदजी गीरी महाराज, सह विविध शिक्षण संस्था,सामाजिक संस्थां कडून अभिवादन करण्यात आले. त्याच प्रमाणे येथील शनिवार पेठ येथून विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादना करिता कैंडलमार्च अभिवादन रैली काढून नमन केले.
*महापरिनिर्वाण दिनी सलग अभ्यास करून वाहिली श्रद्धांजली ला.भु. विद्यालयाचा अनोखा उपक्रम* विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी कोंढाळी येथील लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या १० वी व१२ विच्या विद्यार्थ्यांनी सलग आठ तास अभ्यास करून वाहिली अनोखी श्रद्धांजली. बाबासाहेबांच्या जीवनातील विद्यार्थ्यांनी अंगीकारावा असा सर्वोच्च आदर्श म्हणजे अभ्यास करणे , उच्च प्रतीचे ज्ञान प्राप्त करणे .वैश्विक विद्वान म्हणून मान्यता पावलेल्या प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेबांना त्यांचे आदर्श घेवून अभिवादन करावे या विचाराने प्रेरित होऊन गेल्या आठ वर्षापासून हा प्रकल्प राबवत असल्याचे प्रकल्प संयोजक सुनील सोलव यांनी सांगितले. प्राचार्य गणेश शेंबेकर, उपमुख्याध्यापिका शालिनी इंगळे, ज्येष्ठ पर्यवेक्षक सुधीर बुटे , पर्यवेक्षक डॉ निरंजनमाधव अंजनकर, कैलास थुल यांच्या उपस्थितीत अभ्यास सत्राला सकाळी सुरुवात झाली .एकूण १७० विद्यार्थी आंतरिक प्रेरणेने सहभागी झाले. विद्यालय स्तरावर असा उपक्रम राबविणारी ही विरळीच शाळा आहे असे प्राचार्य गणेश शेंबेकर आपल्या उदबोधनात म्हणाले. अंती झालेल्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी पत्रकारांच्या भूमिकेतून बाबासाहेबांची भूमिका करणाऱ्या विद्यार्थ्याची प्रकट मुलाखत घेवून रंजक कार्यक्रम सादर केला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दुर्गाप्रसाद पांडे, विद्यार्थी नेते आकाश गजबे यांनी विद्यार्थी व विद्यलयाकडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सतत आठ तास वाचन हे राबविण्यात येत असलेल्या अभीनव या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. नियोजन शैलेश चव्हाण, राहुल रक्षित ,वंदना बुटे ,सुनील सोलव, हर्षवर्धन ढोके, सोनाली ठवळे ,मोहिनी भक्ते आदींनी केले. कार्यक्रमाचे संचालन चेतना नागपुरे , देव्यानी वंजारी हिने केले तर आभार प्रदर्शन जानवी डांगरे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या आहाराची व्यवस्था श्याम धिरन व ज्ञानेश्वर भक्ते यांनी केली. या उपक्रमाच्या यशस्वीते करिता संगीता धारपुरे, दुर्गा भट्टड,रवींद्र जायभाये, रुपेश वादाफळे ,समिर लोणारे,अनंत बुऱ्हाण, संध्या भुते, अर्चना ढाले, हेमंत नागपूरे, शिल्पा पाटील, वेदप्रकाश शर्मा, प्रकाश मलवे, हरिभाऊ राऊत आदींनी सहकार्य केले. संस्थाध्यक्ष राजेशजी राठी व सचिव डॉ श्याम लध्दड यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *