कोंढाळीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव आबाल वृद्धानी दिली डॉ बाबासाहेबांना मानवंदना भव्य दिव्य भीम रैली चे आयोजन
Summary
कोंढाळी-प्रतिनिधी घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाचे सविंधान तयार करण्यात मोठे योगदान आहे. देशातील दलित आणि उपेक्षित बांधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. समाजकारण, राजकारण आणि इतर माध्यमांतून त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले. त्याकाळात जागृतीसाठी वृत्तपत्र हे खूप महत्त्वाचे […]

कोंढाळी-प्रतिनिधी
घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाचे सविंधान तयार करण्यात मोठे योगदान आहे. देशातील दलित आणि उपेक्षित बांधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. समाजकारण, राजकारण आणि इतर माध्यमांतून त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले. त्याकाळात जागृतीसाठी वृत्तपत्र हे खूप महत्त्वाचे साधन समजले जायचे. वृत्तपत्रांचे हेच महत्त्व जाणून बाबासाहेबांनी विविध वृत्तपत्रे सुरू केली.
बाबासाहेब आंबेडकर यांनी जी वृत्तपत्रे सुरू केली त्यातून त्यांनी उपेक्षितांचे प्रश्न मांडण्यावर भर दिला. शिक्षणाचे महत्त्व सांगितले. दलित समाजातील लोकांना शिक्षणाची आवड लागावी यासाठीही त्यांनी बरेच प्रयत्न केले. घरातील एक व्यक्ती शिकला की संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो. पुढील पिढ्या शिकत राहतात आणि सामाजिक विकास होतो, असं त्यांच मत होते. असे मत इतीहासकार डॉ प्रा. संजय ठवळे यांनी कोंढाळी येथील भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांचे संयुक्त विद्यमाने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कोंढाळी येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रम माहिती दिली.
या प्रसंगी काटोल तालुका कांग्रेस अध्यक्ष सतीश पाटील चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रपाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सचिव स्वप्निल व्यास, नगर अध्यक्ष संजय राऊत, बाळासाहेब जाधव, रणजीत गायकवाड, गोपाल माकोडे,हरीदास मडावी,दादाराव लोणगाड़गे, विठ्ठलराव उके, पवन पेंदाम, रमण ठाकरे, एकनाथ पाटील, युवराज डेहनकर, प्रशांत खंते, नितीन ठवळे, आकाश गजबे,अफसर हुसेन, प्रज्वल धोटे,वानखेडे पाटील, प्रमोद धारपुरे,राजेंद्र खामकर, दुर्गा प्रसाद पांडे, प्राध्यापक येसनसुरे, शेख समशेर, चंद्रशेखर चरडे, संजय गायकवाड,परिमल हिंगणकर, सह कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. स्वप्निल व्यास यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
विकास नगर कोंढाळी
विकास नगर येथील अखिल भारतीय धम्म सेने चे अंतरंग येथील बुद्धविहारा चे वतीने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्ताने १४एप्रील सुरू होताच फटाक्यांची आतषबाजी व डॉ बाबासाहेबांचे जीवनावर संगीत मय भीम गीत गायले गेले, सकाळी नऊ वाजता पंचशिल ध्वजारोहण, बुद्धवंदना करण्यात आली व 10 वाजता नंतर महाभोजन कार्यक्रमानंतर दुपारनंतर चार वाजता विकास नगर येथून भीम रैली सह शनिवार पेठ येथून आयोजित भव्य दिव्य रैलीत सहभागी झाले.
ज्ञानज्योती बौद्ध विहार पंचशिल नगर
येथील पंचशिल नगर घ्या ज्ञान ज्योती बुद्ध विहार यांचे वतीने महिला सशक्तिकरण साठी आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय स्तरावर नाव लौकीक करणार्या तसेच समाजातील आदर्श म्हणून गणल्या जाणाऱ्या महिलांचे छायाचित्रे माध्यमातून जनजागृती तसेच कोढाळी येथील लाखोटिया भुतडा हायस्कूल च्या राष्ट्रीय स्तरावर निवड झालेलेल्या खेळाडूंचे गुणगौरव अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तर सायंकाळी सहा वाजता येथील शनिवार पेठ येथील अखिल भारतीय धम्म सेना, व समता मैत्री दल, विकास नगर,पंचशील नगर गांधी लेआऊट व सायखोड येथून सर्व आबालवृद्ध महिला पुरूष भाविकांची संयुक्त भव्य दिव्य रैलीत काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीने दिली असून कोंढाळी चे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी आपल्या स्टाफ व होमगार्ड पथकासह कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.