हेडलाइन

कोंढाळीच्या ११ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी – सलील देशमुख

Summary

कोंढाळीच्या ११ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी – सलील देशमुख   कोंढाळी, प्रतिनीधी दुर्गाप्रसाद पांडे   कोंढाळीची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे नव्याने पाणी पुरवठा योजना व्हावी ही  मागणी सातत्याने होत होती. हीच मागणी लक्षात घेता या भागाचे आमदार अनिल देशमुख […]

कोंढाळीच्या ११ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी – सलील देशमुख

 

कोंढाळी, प्रतिनीधी दुर्गाप्रसाद पांडे

 

कोंढाळीची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे नव्याने पाणी पुरवठा योजना व्हावी ही  मागणी सातत्याने होत होती. हीच मागणी लक्षात घेता या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी पुढाकार घेवून तो प्रस्ताव ग्रामिण पाणी पुरवठा मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविला होता. ही योजना मंजुर व्हावी यासाठी सलील देशमुख यांनी सुध्दा पुढाकार घेत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत मुंबई येथे मंत्रालयात येथे बैठक लावली होती.नुकतीच कोंढाळी येथे नविन पाणी पुरवठा योजनेला जल जिवन मिशन कार्यक्रमांतर्गत  मंजुरी मिळाली असून यासाठी ११ कोटी रुपये मंजुर झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रसेचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली आहे.

 

कोंढाळी शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी या भागाचे आमदार असतांना अनिल देशमुख यांनी १० कोटी रुपयाची नविन पाणी पुरवठा योजना मंजुर केली होती. परंतु सातत्याने अनिल देशमुख यांनी कोंढाळी शहरासाठी विकास कामासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्याने येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे येथे पाणी पुरवठा योजनेसाठी नविन निधी आवश्यक असल्याची बाब स्थानीक ग्राम पंचायत येथील पदाधीकाऱ्यांनी अनिल देशमुख यांच्यासमोर मांडली होती. यानुसार त्यांनी संबधाीत विभागाला प्रस्ताव तयार करण्यास सांगीतले होते. मागील १० कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजुर केल्यानंतर त्यात अनेक अडचणी आल्या होत्या. त्या अडचणी या नविन  पाणीपुरवठा योजनेत येवू नये व लवकरात लवकर निधी मंजुर व्हावा  यासाठी जिल्हा परिषद सलील देशमुख यांनी मुंबई येथे मंत्रालयात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत नुकतीच एक बैठक आयोजीत केली होती.

 

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ही योजना पुर्ण झाल्यानंतर किमान १ वर्ष ते चालविण्याचे काम हे संबधीत कंत्राटदारवर बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत जर कंत्राटदाराने कामास विलंब केला तर त्याचा कोणताही वाढिव खर्च देण्यात येणार नाही. ही योजना पुर्ण झाल्यानंतर कंत्राटदार जरी सर्व देखभाल करणार असला तरी नागरीकांना मात्र पाणी पट्टी ही दयावी लागणार आहे. या नविन पाणी पुरवठा योजनेमुळे कोंढाळी शहरातील पाणी समस्या सुटण्यासाठी मोठया प्रमाणात मदत होईल असे मत सुध्दा सलील देशमुख यांनी व्यक्त केली आहे. शिवाय हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी आपण स्वत: संपुर्ण कामावर लक्ष ठेवणार असल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले. ११ कोटीच्या नविन पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिल्याबदल पाणि पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच माजी गृहमंत्री व या भागाचे आमदार अनिल देशमुख यांचे ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच  सदस्य,  यांच्यासह गावकऱ्यांनी आभार मानले आहे.

 

 

फोटो ओळ – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देतांना जि. प. सदस्य सलील देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *