*केकेबीपी टोल प्लाजा येथे नि:शुल्क आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर संपन्न*
नागपूर कन्हान : – भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत नागपुर बायपास कंट्रक्शन प्रा.लि. व महामार्ग पोलीस रामटेक कॅम्प टेकाडी यांच्या विद्यमाने महामार्ग क्र ४४ च्या केकेबीपी टोल प्लाझा येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.
नागपुर बायपास केकेबीपी टोल प्लाझा येथे येणारे वाहन चालक व सर्व कर्मचार्यांचे नि:शुल्क आरोग्य तपासणी, डोळे तपासणी, रक्तदान शिबीराचे ओरिएंटल टोल प्लाजाचे मुख्य प्रबंधक प्रशांत बर्गी, खुमारी टोल प्लाजाचे व्यवस्थापक अतुल आदमणे, महामार्ग पोलीस रामटेक कँम्प टेकाडीचे प्रभारी पोलीस अधिकारी डी एन कांक्रेडवार, कन्हान टोलचे व्यवस्थापक निशांत निनावे, सैनी सर, न्यायमुर्ती कुशवाह आदीच्या प्रमुख उपस्थित सुरूवात करण्यात आली. आशा दवााखाना कामठीचे सर्व डॉक्टर आणि रेन्बो ब्लड बँकेंचे डॉक्टर, नर्स हयांनी सेवा प्रदान केली. या शिबीराचा वाहन चालक व कर्मचा-यांनी लाभ घेतला. यशस्विते करिता टोल प्लाझाचे कर्मचारी प्रविण शेंडे, निलेश सक्सेना, गोपाल मसार , सचिन सरोदे, शरद श्रावणकर, संतोष अंबागडे, रंगराव राऊत आदीने सहकार्य केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147