BREAKING NEWS:
कोल्हापुर महाराष्ट्र हेडलाइन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन

Summary

कोल्हापूर दि. 19 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. छत्रपती शिवाजी […]

कोल्हापूर दि. 19 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विनय कोरे,  आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *