BREAKING NEWS:
अहिल्यानगर महाराष्ट्र हेडलाइन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून श्री साईबाबा समाधीचे दर्शन

Summary

अहिल्यानगर, दि. ५ : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गुरूस्थानचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्री साईबाबा […]

अहिल्यानगर, दि. ५ : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गुरूस्थानचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

त्यांच्यासमवेत जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) गिरीश महाजन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे  उपस्थित होते.

श्री साईबाबा संस्थानच्यावतीने केंद्रीय मंत्री शाह यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *