केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्तीचे घेतले दर्शन
Summary
मुंबई, दि. ३०: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अंधेरी पूर्व येथील श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने स्थापन केलेल्या श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘श्रीं’चे दर्शन घेतले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. […]

मुंबई, दि. ३०: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अंधेरी पूर्व येथील श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने स्थापन केलेल्या श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेतले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘श्रीं’चे दर्शन घेतले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, आमदार मुरजी पटेल व अन्य मान्यवर उपस्थित होते.
०००