कृषी अधिकारी शेतकर्यांचे बांधावर बीज प्रक्रियांचे प्रात्यक्षिके
Summary
वार्तहर-कोंढाळी कोंढाळी परीसरात रबी पेरणीला सुरुवात झाली असुन आज दि. १२/११/२०२२ रोजी मौजा कोंढाळी येथे अन्नसुरक्षा मोहीमेअंतर्गत अनुदानित बियाणे वाटप व शेतकर्यांच्या शेतावर हरभरा बिज प्रक्रिया बुरशीनाशक-किटकनाशक-जिवानुसंवर्धक इत्यादींची (FIR) बिजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक कृषि सहाय्यक जगन्नाथ जायभाये यांनी करुन दाखविले व […]
वार्तहर-कोंढाळी
कोंढाळी परीसरात रबी पेरणीला सुरुवात झाली असुन आज दि. १२/११/२०२२ रोजी मौजा कोंढाळी येथे अन्नसुरक्षा मोहीमेअंतर्गत अनुदानित बियाणे वाटप व शेतकर्यांच्या शेतावर हरभरा बिज प्रक्रिया बुरशीनाशक-किटकनाशक-जिवानुसंवर्धक इत्यादींची (FIR) बिजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक कृषि सहाय्यक जगन्नाथ जायभाये यांनी करुन दाखविले व बियाणे प्रक्रीया करण्याचे फायदेही सांगितले. खरिप हंगामात झालेला पाऊस खुप जास्त आहे त्यामुळे जमिनी ओलावा असल्यामुळे व सततच्या पावसामुळे जमिनीमध्ये हानिकारक बुरशींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रबी पिकांची पेरनी करतांना शेतकर्यांनी बिजप्रक्रीया करुनच पेरणी करावी असे आवाहन काटोल तालुका कृषि विभाकडुन शेतकर्यांना करण्यात येत आहे. जेणेकरुन बियाण्याची उगवण क्षमता वाढते, उगवनी नंतर मर रोगाचे प्रमाण कमी राहते व पिकांना रोगांविरुध्द प्रतिकारक्षमता चांगली राहते.