कुसुमवत्सल्य फाऊनडेंशन तर्फे सहारा प्रोडक्शन हाऊस यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रात सौभाग्यवती 2020 स्पर्धेचे ऑन लाईन आयोजन
Summary
आजच्या बदलत्या परिस्थिति नुसार महिलांना आपले मत मांडण्यासाठी, व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही आगळी वेगळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे पहिले वर्ष असुन, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे, महिलांना घरातच अडकुन राहवे लागले आहे. या स्पर्धेेमुळे महिलांनामध्ये उत्सुकता व […]
आजच्या बदलत्या परिस्थिति नुसार महिलांना आपले मत मांडण्यासाठी, व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही आगळी वेगळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे पहिले वर्ष असुन, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे, महिलांना घरातच अडकुन राहवे लागले आहे. या स्पर्धेेमुळे महिलांनामध्ये उत्सुकता व आवड निर्माण व्हावी म्हणुन ही स्पर्धा खास महिलांनासाठी आयोजित केली आहे. या स्पर्धेची पहिली फेरी ऑनलाइन होणार आहे तर ज्या महिला स्पर्धेत भाग घेतल्या आहे .त्यांना विडियो कॉल द्वारे रँम्पवॉक, मेकअप व स्वतःची माहीती इ. साठी प्रशिक्षण देण्यात येणार. त्यानंतर त्यांची विडियो द्वारे अंतिम फेरीसाठी निवड होईल अंतिम फेरीतील 20 स्पर्धकांना महाबळेश्वर येथे 3 दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंतिम फेरीतील स्पर्धकासाठी फोटोशुट, रँम्पवॉक, वक्तृत्व ,निबंध इ प्रकारच्या वेगवेगळ्या पातळीवर स्पर्धा होईल. त्यानंतरच अंतिम फेरीसाठी विजेत्यांची निवड करण्यात येईल.
महिला नोकरी करतात घर सांभळतात फार व्यस्त राहतात. तर त्यांच्या कलागुणाना यातुन एक नविन व्यासपीठ मिळणार. त्याचा आत्मविश्वास दूढ बणनार या संकल्पनेतुन ही स्पर्धा कुसुमवत्सल्य फाऊनडेंशनच्या अध्यक्षा वैशाली पाटिल यांनी असे सांगितलेले आहे म्हणुनच ही स्पर्धा खास रित्या महिलासाठी आयोजीत केली आहे. प्राथामिक व अंतिम स्पर्धकांना प्रसिध्द गु्मींग प्रशिक्षक जुई सुहास प्रशिक्षण देणार आहे. अंतिम स्पर्धेसाठी फँशन, चित्रपट, सामाजिक अशा संपुर्ण क्षेत्रातील प्रसिध्द मान्यवर परीक्षक म्हणुन लाभले आहे.कलानिकेतन एंटरटेंनमेटस हया इव्हेंट ची व्यवस्था पहात असुन, सहारा प्रोडक्शन हाऊस, राजेन्द्र भवाळकर आणि सुप्रिया ताम्हाने यांचे सुध्दा सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे. महाराष्ट्राची सौभाग्यवती 2020 मध्ये भाग घेण्यासाठी 8625919183 जुई अनिकेत सोनटक्के यांना संपर्क करण्यात यावा असे आव्हान केले आहे.
मंगला गिरीश चुंगडे
महिला न्युज रिपोर्टर
वडसा