कुटुंबाला मारहाण करून लुटले. 1, 87,000 हजाराच्या रोख रकमेसह दागिने लंपास.

तळेगाव (शा. प.) सत्याग्रही
घाटातील घटना. कुटुंबाला
मारहाण करून लुटले.
1, 87,000 हजाराच्या
रोख रकमेसह दागिने लंपास.
पोलीस योद्धा वृत्तसेवा
तळेगाव (शा .प .)
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून प्रवास करणाऱ्या कुटुंबाला अज्ञात चार व्यक्तींनी मारहाण करून रोख रकमेसह दागिने असा एक लाख 87 हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला . ही घटना तळेगाव नजीकच्या सत्याग्रही घाट परिसरात बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली याप्रकरणी उमेश उरकुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला .
मिळालेल्या माहितीनुसार उमेश भैयालाल उरकुडे राहणार भंडारा हे पत्नी चंदा उरकुडे यांच्यासह अलका हर्षे . रेवता उरकुडे, वैभव कुर्वे तसेच कारचालक विशाल नेवारे शेगावला त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते . अंत्य विधी आटोपून मंगळवारी रात्री शेगाव वरुन भंडारा येथे जाण्यासाठी आपल्या एम एच 36 66 31 क्रमांकाच्या कारने निघाले होते. पहाटेच्या सुमारास अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाट परिसरात कारचा समोरील टायर फुटल्याचा आवाज झाला . त्यामुळे चालकाने कार रोडच्या बाजूला थांबवली चालक विशाल व वैभव खाली उतरून स्टेफनी काढण्यासाठी उतरले असता 30 ते 35 वर्षे वयाचे चार व्यक्ती लाठी घेऊन पाठीमागून आले. त्यांनी दोघांनाही मारहाण सुरू केली त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी इतरांवरही हल्ला चढवत जखमी केले . सोबत असलेल्या महिलांजवळ व पुरुषांच्या अंगावरील असे 55 ग्रॅम सोने 18 ग्रॅम चांदी नगदी रोख 11 हजार 400 रुपये असा एक लाख 78 हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला . घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून आरोपींना अटक करण्याची मागणी आहे.
लुटपाटी साठी कटरचा
वापर
उमेश उरकुडे यांच्या मृत जावई यांचे वैद्यकीय उपचाराच्या फाईली चालक विशाल नेवारे यांचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज चोरून चोरटे पसार झाले लूटपाट करण्यासाठी चोरट्यांनी कटरचा वापर केला . तसेच या घटनेच्या पंधरा मिनिटे पूर्वी या दरोडेखोरांनी याच परिसरात नागपुर वरून अमरावती कडे जाणाऱ्या एम एच 19 वीयु 1614 या क्रमांकाच्या राहुल प्रेमदास तायडे राहणार अमरावती याला ही मारहाण करून त्यांच्याकडून दोन हजाराची रोकड लुटली.
महेश देवशोध. ( पत्रकार )