किरण ना.पेठे राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित ………
कामठी …. कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज मधील प्राध्यापिका प्रा किरण पेठे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मनुष्यबळ विकास लोकसेवा ॲकॅडमी च्या माध्यमातून हा पुरस्कार सोहळा दरवर्षी घेण्यात येतो परंतु यावर्षी कोविंड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यस्तरीय ऑनलाईन पुरस्कार सोहळा झूम मिटींग ॲप वर घेण्यात आला या पुरस्कारांमध्येसन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र, मानाचा फेटा आणि मानकरी बॅच) प्रदान करण्यात आले. व आधुनिक सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२० याने गौरविण्यात आले आहे. प्रा किरण पेठे या अर्थशास्त्र या विषयावर अध्यापन करीत असून अध्यापना सोबतच साहित्य लिखाण कविता मांडणी करीत दीडशे कविता त्यांनी लिहिल्या वर्तमानपत्रांनी सुद्धा त्यांच्या कवितांची प्रसिद्ध केली शिवाय त्या सामाजिक कार्यात उत्स्फूर्त भाग घेत असतात प्रा किरण पेठे यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बागडे उपप्राचार्य श्रीमती भौमिक ,पर्यवेक्षक डॉ.अग्रवाल तसेच सतत मार्गदर्शन करणारी त्यांची आई आणि त्यांचे पती दीपक तळखंडे व मुलगी यशस्वी हिला दिले आहे.
राजेश मालापुरे
सावनेर तालुका प्रतिनिधी