किटकनाशकाची सुरक्षित हाताळणी प्रशिक्षण
Summary
कोंढाली संवाददाता काटोल तालुका कृषिविभागाच्या तलुका कृषी कार्यालय व कृषी प्रकल्प संचालक (आत्मा) तसेच काटोल तंत्रज्ञान व्यवस्थापक यांचे संयुक्त विद्यमाने 29ऑगष्ट रोजी सकाळी 10-30वाजता कोंढाळी मंडळक्षेत्रातील शेतकर्यांना येथील बहीरमबाबा देवस्थान प्रांगणात कौशल्य आधारीत शेतकरी व शेतमजूरांसाठी शेतातील पीकांवर किटकनाशके तणनाशकांवर […]

कोंढाली संवाददाता
काटोल तालुका कृषिविभागाच्या तलुका कृषी कार्यालय व कृषी प्रकल्प संचालक (आत्मा) तसेच काटोल तंत्रज्ञान व्यवस्थापक यांचे संयुक्त विद्यमाने 29ऑगष्ट रोजी सकाळी 10-30वाजता कोंढाळी मंडळक्षेत्रातील शेतकर्यांना येथील बहीरमबाबा देवस्थान प्रांगणात कौशल्य आधारीत शेतकरी व शेतमजूरांसाठी शेतातील पीकांवर किटकनाशके तणनाशकांवर फवारणी करतांना घ्यावयाची काळजी तसेच फवारणी कशी हाताळावी या बाबद प्रात्यक्षिक करून माहीती दिली, सोबतच फवारणी प्रसंगी विषबाघा झाल्यास त्याची लक्षणे व प्राथमिक उपाययोजना कश्या कराव्या या बाबद या प्रसंगी किटक तंत्रज्ञान डाक्टर प्रदीप दवणे यांनी माहीती दिली, या प्रसंगी शेतकर्यांनी कपासी, सोयाबीन, संत्रा, मोसंबी सह फळभाज्या वरील असलेल्या रोगाबाबद अनेक प्रश्न उपस्थित केले या प्रश्नांचे समाधानकार उत्तर देण्यात आली।
*फिरती कृषि प्रयोगशाळेची मागण*
या प्रसंगी
या प्रसंगी कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे डाक्टर प्रदीप दवणे,डाॅ बागडे,डाॅ विकास विष्णू, सागर अहिरे, विक्रम भावरी यांनी मार्गदर्शन केले, कृषी प्रशिक्षणाला रामराव ठवले, प्रशांत जनई, सुरेन्द्र व्यास, निम्मत पटेल ठवले, रमेश वंजारी शांताराम कालबांडे, कवडू चव्हान सह कोंढाळी मंडळ चे अनेक शेतकर्यां उपस्थित होते, या प्रसंगी शेतकर्यांनी मृदा, पाणी व जमीन चे आरोग्य तपासणी साठी फिरते प्रयोग शाळा वाहन गावो गावी पाठविण्यात यावी या बाबद मागणी केली,
कृषी विभागाचे जगन्नाथ जायभाये,प्रभाकर कुंभरे, मनोज नासरे, गुलशन वानखेडे, नितिन निगुट, अर्जुन पावडे, कविता जाधव, महेंद्र सोमकुवर, रुपेश बालपांडे सर्व कृषि सहाय्यकांनी आप आपल्या क्षेत्रातील पीका संबधित माहीती दिली ।