कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांचा सन्मान – मा.खा. डॉ. अशोकजी नेते

गडचिरोली | २६ जुलै २०२५
कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून स्पंदन फाउंडेशनच्या वतीने गडचिरोली येथे एक अत्यंत भावनिक आणि देशभक्तिपर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात वीर शहीदांना आदरांजली अर्पण करत माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या गौरवशाली प्रसंगी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
*”सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत” –मा.खा. डॉ. अशोकजी नेते*
कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले : “देशाच्या सीमांवर आमचे वीर जवान अथक जागरूकतेने रक्षण करत आहेत, म्हणूनच आपण निर्धास्तपणे जीवन जगत आहोत. २६ जुलै केवळ एक लष्करी विजय नाही, तर तो भारतीय शौर्य, राष्ट्राभिमान आणि एकतेचा जयघोष आहे.”
*माजी सैनिकांचा सन्मान*
याप्रसंगी मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या वीरांना आदरपूर्वक सन्मानित करत त्यांच्या योगदानाचे गौरवशाली स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, डॉ. प्रशांत चलाख सर, डॉ. सौरभ नागुलवार, डॉ. पंकज सकिनालवार,विविध मान्यवर नागरिक, समाजसेवक, व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभक्तीची ज्वाला कायम प्रज्वलित ठेवणाऱ्या वीर जवानांना सलाम!
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधी
गजानन पुराम
मो. 7057785181