BREAKING NEWS:
हेडलाइन

कारंजा तहसील मधील गारपीट समस्याच्या विळख्यात

Summary

▪ कारंजा तहसील मधील गारपीट समस्याच्या विळख्यात ▪ ▪ गावातील पथदिवे( स्ट्रीट लाईट ) दोन दिवसापासून बंद. अंधारात वास्तव्य▪ ▪ पाईपलाईन असूनही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये    पाण्यासाठी भटकंती ▪ ▪ गारपीट ते लिंगा तीन किलोमीटर पांदण रस्ताचे          […]

▪ कारंजा तहसील मधील गारपीट समस्याच्या विळख्यात ▪

▪ गावातील पथदिवे( स्ट्रीट लाईट ) दोन दिवसापासून बंद. अंधारात वास्तव्य▪

▪ पाईपलाईन असूनही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये    पाण्यासाठी भटकंती ▪

▪ गारपीट ते लिंगा तीन किलोमीटर पांदण रस्ताचे          डांबरीकरण करण्यात यावे▪

 

० पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क ०

० वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ०

 

पंचायत समिती कारंजा घाडगे अंतर्गत येणाऱ्या गारपीट या गावामध्ये अनेक समस्या निर्माण झाले आहे तसेच हे गाव समस्यांच्या विळख्यात आहे असेही म्हणल्यास काही हरकत होणार नाही

1. गारपीट या गावातील स्ट्रीट लाईट म्हणजे पथदिवे दोन दिवसापासून बंद आहे. याची वर्धा, जिल्हा प्रतिनिधी श्री महेश देवशोध ( राठोड ) यांनी चौकशी केली असता विद्युत देयके भरण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायती नसून ती जिल्हा परिषदेची आहे . असे प्रतिपादन उपसरपंच माननीय श्रीमती नंदाताई चव्हाण यांनी सांगितले.

2. गारपीट या गावात उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई भासते . त्यामुळे गावातील सर्व नागरिक संतप्त होऊन सांगतात की आम्हाला नळयोजनेचा काहीही फायदा होत नाही. असे सांगत असतात त्याची कारणही असे आहे की गावात उन्हाळ्यामध्ये भीषण पाणीटंचाई भासत असते. नारा 22 ची पाईपलाईन नेहमी फुटत असते . त्यामुळे बोरगाव ढाले ते गारपिट पर्यंत स्पेशल पाईपलाईन म्हणजे एक वेगळी पाईप लाईन शासनाने टाकून द्यावी असे सर्व गावकऱ्यांचे म्हणणे आहे .

3. गारपीट ते लिंगा हा पांदण रस्ता अंतर 3 किलोमीटर ह्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी समस्त गारपिटवासीयांची मागणी आहे.

4.गारपीट येथील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे दोन वर्षापासूनचे मानधन शासनाने न दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष धुसमळत आहे. त्यामुळे त्याची

मानसिक अवस्था खालावलेली दिसत आहे.

अनेक समस्यांच्या विळख्यात असलेले हे गारपीट

गाव शासनाने आमच्या समस्या सोडवाव्यात ह्या अपेक्षेने चातक सारखी वाट पाहत बसलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *