कायर जवळ मालगाडी (रेल्वे) चे काही डब्बे रुळावरून घसरले…… सुदैवाने जिवीतहानी नाही :- कोळसा झाला दाना फान
वणी परिसर हा कोळसा परिसर म्हणून सर्वत्र परिचित असून सदर परिसर हा ब्लॅक डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जातो, त्यातच वणी रेल्वे स्थानका वरून कोळसा भरलेली रेल्वे नांदेड कडे जात असताना कायर गावाजवळील बाबापूर फाट्या जवळ काही डब्बे रुळा वरून खाली उतरले असल्याची घटना दिनांक 1 मार्च 21 ला सायंकाळच्या दरम्यान घडली.
वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोळसा उत्खनन केल्या जाते. या खाणीतून उत्खनन झालेला कोळसा विद्युत व अन्य उद्योगा करिता वापरला जातो त्यामुळे सम्पूर्ण देशात वणी रेल्वे सायडिंग वरून मालगाडीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतो.
वणी येथे ब्रिटिश काळापासून रेल्वे स्थानक आहे दि 1 मार्चला कोळसा भरलेली मालगाडी नांदेडच्या दिशेने साय 6 वाजताच्या सुमारास निघाली असता कायर गावाजवळील बाबापूर फाट्या जवळ मालगाडीचे काही डबे रेल्वे रुळावरून घसरले.
या घटने मुळे परिसरात चांगलीच तारांबळ उडाली होती, दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती त्यातच, याची माहिती रेल्वे प्रशासनाला कळताच नजीकचे अधिकारी वर्ग घटनास्थळी दाखल झाले होते. रेल्वे नेमकी कशामुळे घसरली असावी हे वृत्त लिहे पर्यंत कळू शकते नाही.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर