हेडलाइन

कामगार नेते डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांची “उपसभापति” पदी निवड!

Summary

कामगार नेते डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांची “उपसभापति” पदी निवड! रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ मुंबई ( रजि.) या जिल्हा महासंघाची कार्यकारणी सर्वसाधारण सभेमध्ये निवडण्यात आली. रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाची सर्वसाधारण सभा जिल्हा महासंघाचे सभापती. वि. ल. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सोशल सर्विस […]

कामगार नेते डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांची “उपसभापति” पदी निवड!

रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ मुंबई ( रजि.) या जिल्हा महासंघाची कार्यकारणी सर्वसाधारण सभेमध्ये निवडण्यात आली.

रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाची सर्वसाधारण सभा जिल्हा महासंघाचे सभापती. वि. ल. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सोशल सर्विस लिग हायस्कूल परेल मुंबई येथे संपन्न झाली. या सभेमध्ये जिल्हा महासंघाची कार्यकारणी २०२२-२०२३ ते २०२६-२०२७ या कालावधी साठी निवडण्यात आली.

१) सभापती- वि. ल. मोहिते (संगमेश्वर)

२) उपसभापती- डॉ. संजय कांबळे बापेरकर (लांजा)

३) अध्यक्ष – विठोबा पवार (चिपळूण)

४) सरचिटणीस – चंद्रकांत तांबे (राजापूर)

५) खजिनदार – देशराज तांबे (खेड).

तसेच प्रत्येक तालुका संघाचा अध्यक्ष यांची जिल्हा महासंघाचे उपाध्यक्ष व तालुका संघाचा जनरल सेक्रेटरी यांची जिल्हा महासंघाचे सेक्रेटरी म्हणून घटनेप्रमाणे निवड करण्यात आली त्याचप्रमाणे प्रत्येक तालुका संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांजवळ चर्चा करून जिल्हा महासंघाची मुख्य कार्यकारिणी जिल्हा महासंघाचे काम अधिक गतीने व प्रभावीपणे होण्यासाठी

१) बौद्ध धम्म संवर्धन समिती.

२) शिक्षण समिती.

३) बौद्ध धम्म साहित्य व वाङमय समिती.

४) आर्थिक सांस्कृतिक व औद्योगिक विकास मार्गदर्शन समिती. ५) आपत्कालीन व्यवस्थापन समिती.

ई. लवकरच जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महासंघाचे सभापती व मीटिंग चे अध्यक्ष वि.ल. मोहिते यांनी जिल्हा महासंघाने ५ वर्षांमध्ये केलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली व जनगणनेमध्ये जिल्हा महासंघाची संविधानात्मक काय भूमिका असावी, तसेच बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा महाराष्ट्र सरकारने करावा म्हणून विधी तज्ञ ऍड. दिलीप काकडे व दिधम्म संहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया या कमिटीने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा जाहीर करून या दोन विषयासंबंधी मुंबई व स्थानिक ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या सभा घेऊन जिल्हा महासंघ जनजागृती करणार आहे. असे जाहीर केले मीटिंगमध्ये जिल्हा महासंघाचे अध्यक्ष विठोबा पवार यांनी प्रत्येक तालुका संघाने जिल्हा महासंघाला २५ प्रतिनिधींची यादी व वार्षिक वर्गणी भरावी अशी विनंती केली. व मार्गदर्शन केले मीटिंग ची सुरुवात व विषयाची मांडणी सरचिटणीस डॉ .संजय कांबळे बापेरकर यांनी केली कार्य अहवालाचे वाचन चिटणीस दीपक कांबळे यांनी केले तर सर्वांचे आभार नवनियुक्त सरचिटणीस चंद्रकांत तांबे यांनी मानले मीटिंगला ७ तालुक्यातील तालुका संघांचे पदाधिकारी व प्रतिनिधी हजर होते.

विठोबा पवार-अध्यक्ष

रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ मुंबई (रजि).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *