नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

काटोल विधानसभा मतदारसंघत बाहेर चे पार्सल स्विकारणार काय????

Summary

काटोल हे मात्तब्बर राजकारण्यांची भूमी आहे काटोल विधानसभा निवडणूक पुर्व अंकेक्षण अब की बार फिर के. टी . एम.? की टी. आ. मा‌.?????? काटोल विधानसभा निवडणुकीत के.टी.एम. फैक्टर महत्त्वाचे ठरत आले आहे. मात्र यात टी फैक्टर ला लांब ठेवत नेहमी […]

काटोल हे मात्तब्बर राजकारण्यांची भूमी आहे
काटोल विधानसभा निवडणूक पुर्व अंकेक्षण
अब की बार फिर के. टी . एम.? की टी. आ. मा‌.??????

काटोल विधानसभा निवडणुकीत के.टी.एम. फैक्टर महत्त्वाचे ठरत आले आहे.
मात्र यात टी फैक्टर ला लांब ठेवत नेहमी के.एम. फैक्टर सत्ता बळकावत आली आहे.
खरे तर टी.आ.मा. फैक्टर युनाइटेड झाले तर के.एम फैक्टर ला टी.आ.मा.फैक्टर जागा दाखवू शकतो. तसे प्रयत्न ही सुरु आहे.
मात्र या साठी टी.आ. मा. बाहेरचे पर्सल आयात करणार असे संकेत एका वृत वाहिनीने दिले आहे.
खरे तर सध्या के. एम. फैक्टर मधिल गृह कलहाचा फायदा टी आ. मा‌. फैक्टर ने उचलवा. तो ही टी आ मा चा उमेदवार काटोल विधानसभेतीलच असावा.
या करीता काटोल, कोंढाळी, भिष्णूर, जलालखेडा,नरखेड, मधे तगडे उमेदवार आहेत (शोधा म्हणजे सापडतील)
आता विवीध मेळावे सुरू झाले आहेत.
महाराष्ट्रात महायुती ची तीन चाकी लोकसभेत पंचर झाल्याने महायुती सरकार ला लाडकपण
आठवलं यात लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडका बेरोजगार, वयो श्री, या सारख्या. योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर घोषीत होत असतांनाच, महागाई बेकाबू होत आहे. लाडक्या बहिणींना दिलेल्या भाऊबीज ओवाळणी किराणां, पालेभाज्या, अन्न – धान्याची महागाईत गेली ). लाडकण करून ही महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणे कठीणच असल्याचे आराखडे विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या मांडत आहेत.
यात आता काटोलाची विधानसभा निवडणुक चुरशी ची ठरणार आहे.
खरे तर जागतिक बीमारी कोरोना काळात गावो गावी फिरून संकट ग्रस्तांना सिधा वाटप, प्राथमिक आरोग्य केंद्रांना/ग्रामिण रूग्णायांना ऑक्सिजन उपकरणे वाटप करून अखंड जन सेवा करणारे तसेच मोवाड, नरखेड, काटोल,कोंढाळी,
भारसिंगी, बाजारगाव व अन्य जि प सर्कल मधे २४×७×३६५दिवस एमरजंसी रूग्णवाहीकेच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत घेतलेल्या युवकांनी ही या निवडणुकीत आपले भाग्य आजमावणार असल्याचे चित्र काटोल विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. यातच आपण ही आमदार बनाव असे इच्छा बाळगणाऱ्यांची फौज काटोल विधानसभेत प्रचार करतांना दिसत आहे. तसे पक्ष वाढ ही झाले आहेत.
काटोल विधानसभेत आधीपासून कांग्रेस जनसंघ, यांच्यात लढत होते होती, नंतर ‌विभक्त कांग्रेस (पवार कांग्रेस /व इंदिरा कांग्रेस), सध्या राष्ट्रवादी काँग्रेस भाजप मधे तगडी लढत असते, या लढतीत एकदा कांग्रेस चे पदाधिकारी भा ज प चे उमेदवार झाले, यात जूने कांग्रेसींनी आंतरिक मदत पोहोचली या मुळे का होईना पण भा ज प चे कमळ फुलले. सध्या शरद पवार यांच्या जुण्या घड्याळाची टिकटिक चालूच आहेत. मात्र शरद पवारांच्या हात चे घड्याळ निवडणूक आयोगाने ते घड्याळ पवारांचे पुतणे अजितदादा यांना दिल्याने पवार साहेबांना तूतारी ने फूंकर घालून दुटप्पी धोरणावर वार करून आपली पकड मजबूत करत आहेत. यात या भागातील विद्यमान आमदार शरद पवार ज्यांना उमेदवारी देणार त्यांचे काम करणार की स्वतः उमेदवार होणार हे‌ लवकरच कळेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार यांचे कार्यकर्ते ही काटोल रा का अजित पवार यांच्या गटाला सुटणार समजून कामाला लागले आहेत. कांग्रेस चा कार्यकर्ता म्हणून गावोगावी आपली ओळख निर्माण करत आहे.
खरा प्रश्न तो सत्तारूढ पक्षाच्या मुख्य पक्ष भाजपा चा येथील भा ज पा चे नेटवर्क मजबूत आहे. पण उघड उघड नसले तरी आंतरिक गटात विभक्त आहेच. तसेच ठाकूर/देशमुख नको म्हणत सतरंजी ‌ गट ही राष्ट्रवादी (शरद पवार) ‌सोडून भा ज प, सेना एकनाथ, राष्ट्रवादी अजित पवार यांचे कडे गटा गटाने जाऊन तिकीट दिल्यास आम्ही एक राहून आमचा विजयी कसा होईल हे सांगत दावा करत आहेत.
खरेतर ही लढत भा ज प‌ व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)या गटातच होईल अटि तटिची होईल, वेळी प्रसंगी एकाच कुटुंबातील दोन उमेदवार असू शकतात.
मात्र भा ज पा या निवडणुकीत के.टी .एम फैक्टर की आयातीत *टी आ मा च्या उमेदवारांवर डाव साधणार?
महाविकास आघाडीचे शे का प ही आपली दावेदारी सांगत आहेत .
घोड मैदान जवळ आहे, पहा काय होते ते. पण ‌शरद पवार व देवेंद्र फडणवीस कूणाला आपला उमेदवार करतात हे अनिश्चित असले तरी सध्या भा ज प चे दोन्ही गट, अभी भी नही तो कभी नही! बाहरे पार्सल स्विकारतात की नाकारतात यावर सर्व खेळ सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *