नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

काटोल -नागपूर मार्गावर भिषण दुर्घटना सोनखांब -ताराबोडी शिवारातील घटना भिषण दुर्घटनेत मेंढेपठार (बाजार)येथील सहाजण मृत मेंढेपढार व लगतच्या परिसरात शोककळा

Summary

कोंढाळी / काटोल        १६डिसेंबर चे रात्री ०१वाजताचे दरम्यान काटोल -नागपूर मार्गावर मौजा सोनखांब व ताराबोडी चे मधोमध मार्गावर ट्रक -कॉलीस कार चे भिषण धडकेत कॉलीस मधील सहाजनांचा मृत्यू झाला असून एक इसम अत्यंत गंभीर अवस्थेत उपचार घेत […]

कोंढाळी / काटोल
       १६डिसेंबर चे रात्री ०१वाजताचे दरम्यान काटोल -नागपूर मार्गावर मौजा सोनखांब व ताराबोडी चे मधोमध मार्गावर ट्रक -कॉलीस कार चे भिषण धडकेत कॉलीस मधील सहाजनांचा मृत्यू झाला असून एक इसम अत्यंत गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.
या घटनेची ची हकिकत अशी की नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीच्या लग्न प्रसंगी नागपूर येथे स्वागत समारंभ आटोपून कॉलीस कार क्र.एम एच ३१-बी डब्लू-११११ने आपल्या गावी मेंढेपठार कडे परत येत असताना सोनखांब -ताराबोडी शिवारात पोहोचले असला काटोल वरून नागपूर कडे जाणारा ट्रक क्र एम एच ४०-ए के -३८१७ ने कॉलीस कार ला जबरदस्त धडक दिली झाली या भयंकर धडकेत कॉलीस कार चाक्कचूर झाली या कॉलीस मधील मयुर मोरेश्वर इंगळे,(२२), विठ्ठल थोटे(४२),अजय दशरथ चिखले(४०),वैभव चिखले (३०), रमेश ओमकार हेलोंडे,(५३),सुधाकर रामचंद्र मानकर (५२) हे जागीच ठार झाले तर जगदिश ढोणे ह्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच काटोल पोलीस घटनास्थळी पोहोचून काटोल -नागपूर मार्गावरील जाम ट्राफिक सुरू केले , या घटनेची माहिती मिळताच मेंढेपढार, तसेच लगतचे‌ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या दुर्दैवी घटनांमुळे मेंढेपढार व परिसरात शोककळा पसरली आहे. काटोल पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी या घटनेचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *