काटोल-नरखेड तालुक्यामधे अवैध दारू निर्मिती व विक्री जोमात उत्पादन शुल्क व गृह विभाग कोमात उत्पादन शुल्क व पोलीस अधिक्षक या कडे लक्ष देतील काय?
Summary
कोंढाळी-वार्ताहर काटोल तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दितील राज्यार्ग -राज्य महामार्ग व राष्ट्रिय महामार्गासह नरखेड तालुक्यातील आणी आजुबाजुच्या अनेक गावात परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मिती व विक्री जोमात सुरू आहे. याकडे स्थानिक व जिल्हा उत्पादन शुल्क प्रशासन कानाडोळा करत […]
कोंढाळी-वार्ताहर
काटोल तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दितील राज्यार्ग -राज्य महामार्ग व राष्ट्रिय महामार्गासह नरखेड तालुक्यातील आणी आजुबाजुच्या अनेक गावात परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मिती व विक्री जोमात सुरू आहे. याकडे स्थानिक व जिल्हा उत्पादन शुल्क प्रशासन कानाडोळा करत असल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे.
काटोल-पारडसिंगा- मुर्ती, रिधोरा, कचारी सावंगा, राज्य,राज्यमहामार्ग, राष्ट्रीय महामार्गावरी ढाबे, रिसोर्ट, बार ,सरकार मान्य दारूचे दुकांनांचे माध्यमातून तसेच कोंढाळी,सायखोड,चाकडोह, धोतीवाडा, आदी ठिकाणी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत खुलेआम देशी व गुळआंबा दारूची विक्री केली जाते. महामार्गालगतचे कारखान्यांकरीता मालाची वाहतूक करनारे ट्रक चालक कंडक्टर यांचे सह कामगार व शहरी व ग्रामीण भागातील युवकांना दारूचे व्यसन जडले आहे. कोरोना संकट काळात सरकारी दारू दुकाने, बिअर बार, सुरू ठेवण्यावर असलेले निर्बंध याचा फायदा काटोल येथील काही अवैध दारू निर्माते व विक्रेत्यांनी गावो गावी खाजगी वाहनाने अवैध व नकली दारू पोहचविण्याचे काम सुरू आहे व लाकडाऊन चे काळात अधैव दारूला ग्राहकी चांगली असल्यामुळे तसेच आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे अनेक व्यक्तींनी या व्यवसायात उडी घेतली आहे.
मद्यपी मद्य प्राशन करून सार्वजिनक ठिकाणी गोंधळ घालत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्या महिला, कामगार, व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तक्रार देण्यास कुणी पुढे येत नसल्यामुळे अवैध दारू विक्री व मद्यपींचा त्रास वाढला आहे. कामगार व युवक दारूच्या व्यसनात गुरफटल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. व्यसनप्र(जीणार्यांच्या घरात भांडणाचे प्रकार वाढले असून दारूची चोरटी विक्री थांबविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. मिळेल त्या ठिकाणी रोजंदारी करून आलेली मजुरी कामगार दारूवर खर्च करीत आहेत.
दारू विक्री करणार्यांची दहशत असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाही. यामुळे दारू विक्रीचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. आदी ठिकाणी खुलेआमे अवैध दारूची विक्री जोमात सुरू आहे. शिवाय अनेक हॉटेल, अंडा आम्लेटच्या हातगाड्यांवर रात्री उशिरापर्यंत दारूची विक्री करण्यात येते. दारू विक्रेत्यांकडून ‘मलिदा’ मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात उत्पादन शुल्क विभाग कानाडोळा करत असुन पोलीस प्रशासनाचे ही आपोआप मिळकत मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
काटोल तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दितील व उत्पादन शुल्क विभागा अंतरगत येणार्या भागातील ढाबे, रिसोर्ट, दारुची दुकान तसेच बिअर बार यांचे मार्फत काही हाॅटेल, ढाब्यांवरून लगतच्या वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, कारंजा, आष्टी, तळेगाव, या तालुक्यातही अवैध दारू चा पुरवठा सुरू आहे , या करिता नागपुर जिल्हा पोलीस अधिक्षक, उत्पादन शुल्क विभाग अधिकक्षक, दोन्ही विभागाचे (उपविभागीय उत्पादन शुल्क-व पोलीसअधिकारी ) अधिकारी यांनी काटोल-कोंढाळी-पारडसिंगा, मुर्ती, या भागातून होनारी अवैध दारू तस्करी रोखण्याचे योग्य नियोजन केल्यास अवैध दारू निर्मिती व विक्रेत्यांवर चाप बसू शकते. असे स्थानिय नागरिकांचे म्हणणे आहे.
*धोतीवाडा येथे मोह फुलांची ची दारू जोरात*
*मोहफुलाच्या दारू चा कुटीर उद्योग बंद करनार तरी कोण?*उत्पादन शुल्क विभागाचे डोळे झाक पणा*
काटोल-प्रतिनीधीनी
कोंढाळी व परिसरातील सरकारमान्य दारू ची दुकाने बंद असल्याने आता ग्रामीण भागात मोहफुलाची दारू काढून धोतीवाडा -खापा व लगतचे वर्धा जिल्य्हाचे अनेक गावात अवैध दारू विक्रि सुरूअसुन या अवैध दारू विक्रेत्यांवर पोलीस व उत्पादन शुल्क विभागा कडून निर्बंध घालणे गरजेचे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अनुसार कोंढाळी पासून 17किलो मिटर अंतरावरील नागपुर – वर्धा जिल्य्हाचे सीमेवरील नागपुर जिल्ह्याचे काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीतील येणार्या धोतीवाडा या गावात सध्या मोहफूल-काळा गुळ काही रसायनयुक्त दारू ची निर्मिती जोरात सुरू आहे. यात धोतीवाडा येथील दोन तिन व्यक्तींकडून अवैध दारू गाळप करने सुरू आहे. विषेश म्हणजे धोतीवाडा येथील अवैध दारू निर्मिती करनारे दारू काढण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील गरमसुर या गावालगतचे नाल्या अवैध भट्ट्या लावल्या आहेत. नाल्याला पाणी नसले तरी आजू बाजूचे विहीर पंपावरून भाड्याने पाणी घेऊन हा अवैध दारू निर्मिती व विक्रि सुरू आहे.
हा कुटीर उद्योग कोंढाळी-कारंजा व सेलू पोलीस स्टेशन चे संयुक्त सीमेवरील व जंगली भाग असल्याने याकडे कुणाची नजर ही पडत नाही तर दारू शौकिनांना गावतच दारू मिळत असल्याने अवैध दारू विक्रेत्यांवर कुणीही कार्यवाही करत नाही , याकडे उत्पादन शुल्क व गृह विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करने गरजे चे आहे .
*चला धोतीवाडा*
वांरवार सांगून, समुपदेशन करुन, उपचार करुन सुद्धा अनेक जण दारु पिणे सोडत नाही. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीपासून दारुची दुकाने, बार रेस्टारं ट बंद झाल्याने बेवड्यांना चांग लीच अद्दल घडली आहे. जे दारु पिल्याशिवाय एक दिवस सुद्धा राहु शकत नाही असे अनेक जण तालुका, गावांकडे धाव घेत दारुची शोधाशोध घेत आहे.
यासाठी ते जास्तीचे पैसे मोजून सुद्धा क्वॉटर घेण्यास तयार आहे. मात्र आता बहुतांश गावात अनोळखींना नो एन्ट्री झाल्याने बेवड्यांचे हातपाय थरथरायला लागली आहे.नागपुर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू झाल्यापासून दारुची सर्व दुकाने बंद करण्यात आली.
रेस्टारंट, धाबे बंद केल्यानंतर ही ग्रामीण भागात अनेकांना सहजपणे दारु मिळत होती. मात्र लोकांनी रस्त्यावर फिरणे, गर्दी कमी न केल्यांने राज्य शासनाकडून ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन जाहिर करुन संचारबंदी करण्यात आली. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहिर केल्याने दररोज दारु पिणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे.
चोरटी विक्री, स्टॉक संपला
सध्या शहरात काही ठिकाणी चढ्या दराने चोरट्या मार्गाने दारु विक्री झाली. आता स्टॉक संपल्याने अनेकांनी ग्रामीण भागात, तालुक्याच्या ठिकाणी धाव घेत दारु खरेदी केली. अजुन ही अनेक ठिकाणी दारुचा साठा असल्याने आपल्या ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून दारु खरेदी केली जात आहे. काही जण तर क्वॉटर कुठे मिळते असे विचारतात. आता त्यांना या दुकानांवर सुद्धा दारु मिळत नाही.
अनोळखींना गावात नो एन्ट्री
कोरोनाच्या बाबतीत जनजागृती झाल्याने जवळपास सर्वच गावांनी अनोळखी व्यक्तांनी नो एन्ट्री केली आहे. गावात येतातच त्यांना कशासाठी आला आहात याची विचारणा केली जात आहे. अनेक जण दारु खरेदीसाठी येत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळत असल्याने त्यांनी आता अनोळखींना येण्यास मज्जाव केल्याने दारुड्यांची चांगलीच फजिती झाली असून आता त्यांना पुढील २० दिवस तरी विनादारुची तरी काढावे लागणार आहे.
सध्या नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोंढाळी नजिकच्या धोतीवाडा या गावात मोहफुलाची दारूचा मुबलक साठा असल्याचे सांगण्यात आले आहे. कोंढाळी भागातील तळीरामांचा धोतीवाडा या अवैध दारू विक्रि करीता कुसुप्रसिद्ध गावा कडे नागरिकांची रिघ लागली आहे संचार बंदी चे नियमावली ची नजर चुकवत हा अवैध कारभार सुरू आहे.
पहा अवैध दारू विक्रि सुरू आहे बंद होत असल्यास बंद करा अन्यथा चला धोतीवाडा हा तळीरामांचे घोष वाक्य!