काटोल -नरखेड-कोंढाळी- जलालखेडा बसस्थानक दुरूस्ती साठी १७कोटीं ची मंजूरी काटोल आगाराकरिता आवश्यक २५बसेस लवकर मिळणार
Summary
काटोल -वार्ताहर काटोल विधानसभा मतदारसंघातील प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांच्या बस सेवेच्या समस्या सोडविण्यासाठी काटोल येथील पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच एस टी महामंडळाच्या प्रवासी वाहतूक संबधी चे तक्रार निवारण निवारणासाठी जिलापरिषद सदस्य सलील देशमुख […]

काटोल -वार्ताहर
काटोल विधानसभा मतदारसंघातील प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांच्या बस सेवेच्या समस्या सोडविण्यासाठी काटोल येथील पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच एस टी महामंडळाच्या प्रवासी वाहतूक संबधी चे तक्रार निवारण निवारणासाठी जिलापरिषद सदस्य सलील देशमुख यांनी समस्या निवारणासाठी ०७आगस्ट रोजी काटोल नरखेड तालुक्यातील पदाधिकारी ,समस्या ग्रस्त
विद्यार्थी यांच्या सह आढावा बैठक घेण्यात आली. काटोल पंचायत समिती चे सभापती संजय डांगोरे यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रवीण जोध यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच काटोल पंचायत समिती चे उपसभापती निशिकांत नागमोते यांच्या सह काटोल नरखेड पंचायत समिती व जि प चे उपस्थित सदस्य तसेच गावो गावचे सरपंच यांचे प्रमुख उपस्थितीत काटोल पंचायत समितीच्या सभागृहात समस्या सोडविण्यासाठी बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी महाविद्यालयीन व शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच गावोगावच्या विद्यार्थीनींनी प्रवासी बस सेवा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या तर उपस्थित जनप्रतिनिधी आप आपल्या गावाकरीता प्रवासी सेवे साठी वेळेवर तसेच अतिरिक्त प्रवासी सेवेची या प्रसंगी मागणी करण्यात आली.तर काही प्रवासी व विद्यार्थींनी विद्यार्थी पास वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
प्रवासी व-विद्यार्थांच्या समस्या सोडविण्यासाठी सलील देशमुख, सभापती प्रवीण जोध,सभापती संजय डांगोरे, यांनी एस टी चे वरिष्ठ अधिकारीयांना धारेवर धरले तसेच समस्या निवारण करण्यासाठी सांगितले.
३०प्रवासी बस संखेची कमी
काटोल विधानसभा मतदारसंघातील प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांच्या बस सेवे सुरळित नियोजन करून प्रवासी सेवा द्यायच्या देण्यासाठी काटोल आगाराकरिता ३०प्रवासी बसेसची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नागपूर विभागाचे विभाग नियंत्रक घुले यांनी सांगितले. आज आगारात ज्या प्रवासी बसेस उपलब्ध आहेत . त्या बसेस च्या भरवशावर विद्यार्थ्यी प्रवासी सेवेला प्राधान्य देण्याचे आश्वासन विभाग नियंत्रक यांनी दिले.तर आपल्या भागातील शळा महाविद्यालय सुरू होने व शाळांची सुटी होने बहूतेक एकच वेळ असल्याने व प्रवासी बस संख्या कमी असल्याने प्रवासी सेवे करिता पालक , शिक्षक व विद्यार्थी यांनी सहकार्य करावे असे आवाहन आगार व्यवस्थापक यांनी केले तसेच काटोल बस स्थानकासह नरखेड , जलालखेडा, कोंढाळी येथील बस स्थानकावर पोलीसांची गस्त असने
गरजेचे आहे. असे काटोल आगाराचे आगार व्यवस्थापक अनंत तातर यांनी सांगितले.
२५प्रवासी बस सेवा लवकरच मिळणार
काटोल विधानसभा मतदारसंघातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे नियोजनासाठी काटोल आगाराकरिता आवश्यक २५ते३०बसेस लवकरच (नोव्हेंबर महिन्यात पर्यंत) मिळणार आहे तसेच कोंढाळी -काटोल-नरखेड-
जलालखेडा बस स्थानकाचे आद्यवतीकरणारिता१७कोटी रूपयांची मंजूरी मिळाली असून येथील कामे लवकरच सुरू होणार अशी माहिती सलील देशमुख यांनी या प्रसंगी दिली.
बस स्थानकाचे पोलीस चौकीला कुलूप
एस टी महामंडळाच्या समस्या सोडविण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर काटोल बसस्थानकावरील प्रवासी समस्या जाणून घेण्यासाठी सलील देशमुख यांनी व उपस्थित जनप्रतिनिधी सह काटोल बस स्थानकावर पोहचून विद्यार्थी व प्रवासी यांच्या सह संवाद साधला व प्रत्यक्षात समस्या जाणून घेतल्या. या प्रसंगी पोलीस स्टेशन काटोल तर्फे संचालीत बस स्थानकावरील पोलिस चौकिला कुलूप लागले होते. या बाबतीत पोलीस अधिकारी यांचे सोबत बैठक घेऊन सुरक्षा समस्या सोडविण्याची माहिती दिली .