BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

काटोल, नरखेड आणि मोवाड शहरातील पाणी पुरवठा योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Summary

मुंबई, दि. १० : काटोल, नरखेड आणि मोवाड शहरांतील नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठीच्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे काटोल, नरखेड व मोवाड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री […]

मुंबई, दि. १० : काटोल, नरखेड आणि मोवाड शहरांतील नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठीच्या पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे काटोल, नरखेड व मोवाड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. बैठकीत आमदार चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, प्रधान सचिव गोविंदराज, अभिषेक कृष्णा, इ. रविंद्रन तसेच सचिव अश्विनी भिडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या तीनही शहरांतील पाणीटंचाईची समस्या दूर करणे हे करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. नागरिकांना दररोज नियमित पाणी मिळावे, यासाठी पायाभूत सुविधा योजनांना गती देण्यात यावी. या कामांमध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नगरोत्थान योजनेअंतर्गत उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *