नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

काटोल तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांचे १५ जुलै पासून काम बंद आंदोलन सुरू; प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन, कामकाजावर होत आहे परिणाम

Summary

काटोल/-वार्ताहर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने या आंदोलनाची हाक दिली आहे. प्रलंबित मागण्यासाठी १५जुलै सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे महसूल कर्मचार्यांनी ही काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. काटोल तालुक्याच्या महसूली […]

काटोल/-वार्ताहर
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने या आंदोलनाची हाक दिली आहे. प्रलंबित मागण्यासाठी १५जुलै सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनात नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे महसूल कर्मचार्यांनी ही काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. काटोल तालुक्याच्या महसूली कर्मचारी संघटनेचे अध्यक्षांचे मते आंदोलना बाबद माहिती दिली की
सुधारित आकृतिबंध हा दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनूसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता त्वरित लागू करा, यासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी १५जुलै सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले असून आंदोलक कर्मचार्यांनी चक्क तहसीलदार कार्यालया समोरच आंदोलनाचा ठिय्या मांडला आहे, अशी माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अतुल सुपारे, सचीव विक्रम कोकणे यांनी दिली.
*काम बंद आंदोलन*
*प्रलंबित मागण्यासाठी १५ जुलैपासून आंदोलन सुरु*
*मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियानाचे कामावर परिणाम*
काटोल/
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने या आंदोलनाची हाक दिली आहे. या हाकेला काटोल तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत गेल्या काही वर्षांत अन्याय झालेला आहे. आठ वर्षापूर्वी मागण्या मान्य होऊनदेखील त्याबाबत अद्यापही शासन निर्णय होत नसल्याचे संघटनेने नमूद केले. २००६ मध्ये महसूल विभागाचा आकृतिबंध तयार करण्यात आला. त्यानूसार २०१६मध्ये आकृतिबंध होणे क्रमप्राप्त होते. मात्र अद्यापही आकृतिबंध मजूर झाला नाही. जुनी पेन्शन योजना तसेच,प्रलंबित मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १५ जुलैपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने बेमुदत काम बंद आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
*अनेक पदे रिक्तच*
सद्यस्थितीत पूर्वीच्या आकृतिबंधानुसार काटोल उपविभागीय कार्यालय/तहसीदार कार्यालयात/ अनेक पदे रिक्तच आहे. त्यामुळे एकाच कर्मचाऱ्याकडे दोन ते कामाचा अतिरिक्त कार्यभार दिला जात असल्याचे संघटनेने नमूद करत सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता त्वरित लागू करा, यासह अव्वल कारकून या पदावर पद्दोन्नती देण्यात यावी अशी मागणी केली.
मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पद्दोन्नती देण्यात यावी, महसूल सहायकांचे ग्रेड पे २ हजार ४०० रुपये करा, अव्वल कारकून या संवर्ग पदाचे नामांतर सहायक महसूल अधिकारी असे करण्यात यावे, यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आल्याचे संघटनेचे अतुल सुपारेयांनी सांगितले. प्रलंबित मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १० जुलैपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने बेमुदत काम बंद आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
या आंदोलनात अध्यक्ष अतुल सुपारे, उपाध्यक्ष निलेश झेले,सचीव विक्रम कोकणे, राजू ठोंबरे कोषाध्यक्ष तसेच के एस बागडे,के एच जाधव, जी डी नागवे,आर एस दुधपचारे, आनंद गायकवाड, दत्तात्रय सालबर्डे,आर एस पवार, तसेच एस डी सिलाम व अन्य महसुली कर्मचारी आप आपल्या टेबलावरील काम बंद करून काटोल येथील‌ तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन स्थळी बसले होते.
कामावर परिणाम
नागपूर जिल्ह्यातील काटोल हे आदिवासी बाहूल क्षेत्र आहे ग्रामीण आदिवासी भागातील नागरीकांना आप आपल्या कामासाठी तालूक्याचे ठिकाणी आल्यावर येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी असल्याने, मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियानाला मोठा फकटा बसत असून , राशन कार्ड तसेच अनेक महसुली कामे होत नसल्याने ग्रामीण आदिवासी बाहूल भागातील नागरिकांचा श्रम व धन व वेळ वाया जात आहे. असे कामठी चे उपसरपंच मंगेश राऊत‌,राजु किनेकर, व निलेश चौधरी यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *