काटोल तालुक्यातील कोंढाळी येथे ऑक्सिजन बेड ची कोविड सेंटर सुरु करा प्रमोद वासुदेवराव चाफले यांची मागणी
Summary
कोंढाळी-प्रतिनिधी काटोल तालुक्यासहा कोंढाळी प्रा.आ.केंद्राअंतरगत येणारे कोंढाळी नगरी सह 42 गावांचे नगरिकांच्या कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांच्या संख्येने( दोन हजारांच) टप्पा गाठला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत असताना बेड व ऑक्सिजन अभावी अनेकांचा दुर्दैवाने बळी जात आहे. या […]
कोंढाळी-प्रतिनिधी
काटोल तालुक्यासहा कोंढाळी प्रा.आ.केंद्राअंतरगत येणारे कोंढाळी नगरी सह 42 गावांचे नगरिकांच्या कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांच्या संख्येने( दोन हजारांच) टप्पा गाठला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत असताना बेड व ऑक्सिजन अभावी अनेकांचा दुर्दैवाने बळी जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तसेच स्थानिय समाजसेवी फंडातून तालुक्यातील काटोल ग्रामिण रूग्णालयात ११ऑक्सीजन काॅन्सन्टेट्रटरमशिन चे माध्यमातून कोविड प्रतिबंधात्म इलाज लवकरच सुरू होणार आहे।
काटोल नरखेड या दोन्ही नगरपरिषदे नंतर कोंढाळी हेच मोठी ग्राम पंचायत आहे। येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे २४×७×३६५ आय पी एच एस दर्जाचे असुन ४२गावांचे नागरिकांचे आरोग्य तपासनी येथे होते। तसेच कोविड १९ने या भागातील अनेक गांव कोरोना विषाणू च्या विळख्यात आहे। येथील कोरोनाचे हायरिस्क चे रूग्णांना नागपुर रेफर केले जाते। मात्र शहरातील सर्व कोविड रूग्णालय बेडफुल असल्याने या भागातील रुग्णांना वाहनातच मृत्यु ला कवटाळे जात आहे ।या करीता कोंढाळी येथील मागासवर्गीय वसतीगृहात सर्व सोईसुविधांयुक्त (ऑक्सीजन कंन्सेट्रेटर युक्त ) १० ऑक्सीजन बेडचे कोविड सेंटर तत्काळ सुरू करून कोंढाळी व लगतच्या गाववासीयांना दिलासा द्यावा अशी मागणी काटोल तालुका भा ज पा युवा मोर्चा चे महासचिव प्रमोद वासुदेवराव चाफले यांनी राज्य व केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.
कोंढाळी प्रा.आ.केंद्राअंतरगत तब्बल दोन हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. बेड आणि ऑक्सिजन अभावी अनेकांना रूग्णालय चे ऐवजी रुग्णवाहिकेतच जीव गमवावा लागल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. कोंढाळी नगर व पी एच सी अंतरगत रुग्णांसाठी कोंढाळी येथे नव्याने कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी द्यावी। तर सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी लाखो रूपयांचा खर्च करणे परवडत नाही. कुठेही बेड आणि ऑक्सीजन उपलब्ध नसल्याने घरातील कर्ते पुरुष, महिला कोरोना बाधित होऊन मृत्यूमुखी पडत आहेत.
त्यामुळे कोंढाळी येथील मागासवर्गीय शासकीय वसतीगृहाच्या प्रशस्त इमारतींमध्ये सर्व सोईसुविधांयुक्त ऑक्सीजन कंन्सेट्रेटर युक्त १० ऑक्सीजन बेडचे स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करावे, अशी आग्रही मागणीही प्रमोद वासुदेवरावजी चाफले केली आहे ।