काटोल-कोंढाळी शेटल फेरीबस सेवा सुरू करा विधार्थ्यासह नागरिकांची मागणी कोंढाळी वाहतूक नियंत्रण कक्षासाठी अतिरिक्त वाहतूक नियंत्रकाची नियुक्तीची मागणी
Summary
कोंढाळी -वार्ताहार- दुर्गा प्रसाद पांडे तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वर्दळीच्या कोंढाळी बसस्थानकासाठी,पूर्वी सुरू असलेली शटल फेरी बस सेवा काटोल ते कोंढाळी बस सुरू करण्याची मागणी नागरिकांसह विध्यार्थ्यानी मागणी काटोल आगार प्रमुख तसेच […]
कोंढाळी -वार्ताहार- दुर्गा प्रसाद पांडे
तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांच्या व शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वर्दळीच्या कोंढाळी बसस्थानकासाठी,पूर्वी सुरू असलेली शटल फेरी बस सेवा काटोल ते कोंढाळी बस सुरू करण्याची मागणी नागरिकांसह विध्यार्थ्यानी मागणी काटोल आगार प्रमुख तसेच जि प सदस्य सलील देशमुख याना निवेदन देऊन करण्यात आली आहे
नागपूर विभागातील काटोल बस आगारांतर्गत येणाऱ्या कोंढाळी बस स्थानकावरून दररोज सकाळी ०५ ते रात्री ११ वाजेपर्यंत नागपूर-अमरावती व काटोल तालुक्यातील बस स्टेशन ला जोडणार्या लगतच्या ४३ गावांच्या भागातील प्रवाशी व शालेय विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांच्या वाहतुकीसाठी कोंढाळी बसस्थानकातून प्रवासी बस फेर्या सोडण्यात येतात. त्यात वर्षांपूर्वी काटोल कोंढाळी शेटल बस फेरी सुरू होती त्यामुळे एक एक तासाने कोंढाळी काटोल करिता बस सेवा प्रवाशाना मिळत होती आता महिलांना बस मध्ये 50 टक्के सवलत असल्यामुळे तसेच कोंढाळी वरून विधालय व महाविधालय विधार्थी शिक्षण घेत असल्यामुळे या मार्गावर सकाळ ते संध्याकाळ प्रवाशी असतात त्यांना तासन तास कोंढाळी किंवा काटोल आगारात बस करिता तातकळत बसावे लागते
कोंढाळी येथे अतिरिक्त वाहतूक नियंत्रकची मागणी
त्याचप्रमाणे के-टू-पीजी आणि तांत्रिक शिक्षणाचे (शाळा, इंग्रजी माध्यम, महाविद्यालय, आय टीआय, टायपिंग, शिवणकला इ. व्यावसायिक प्रशिक्षण) साठी कोंढाळी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1785 पेक्षा जास्त आहे.सध्या येथे दोन वाहतूक नियंत्रक नियुक्त आहेत. कोंढाळी बसस्थानक, ज्यामध्ये संबंधित वाहतूक नियंत्रकांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत एकच वाहतूक निरीक्षक ड्युटीवर असतो. मात्र या काळात एकच वाहतूक नियंत्रक कामगिरीवर असतो आणि तोही एकच शिफ्ट मधे असतातो. महामार्गावरील प्रवासी वाहतूक बसेसमध्ये तांत्रिक बिघाड, अपघातांची बस चालकाकडून आलेल्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयात पाठविताना मोठी अडचण होते.
दुसरीकडे शाळा-महाविद्यालये, तंत्रशिक्षण आणि उच्च शिक्षण सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय सवलत प्रवाशी पास, आवडेल तेथे प्रवासाकरीता पासेसचे वितरण सोबतच दररोज च्या 442 बसेसच्या लॅगसीटवर एन्ट्री दोन्ही काम एकाच वेळी करता येत नाही, त्यामुळे स्थानिक व प्रादेशिक दळणवळण नियोजन नियोजित ठेवण्यासाठी नागपूर विभाग नियंत्रक व काटोल आगार व्यवस्थापक यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोंढाळी बस वाहतूक नियंत्रण केंद्रात बसेसच्या वाहतूक एन्ट्री साठीअसलेल्या दोन वाहतूक नियंत्रकां ऐवजी व विद्यार्थ्यांना पासेस वाटप करण्यासाठी एक अतिरिक्त नियमित वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी काटोल आगाराचे आगार प्रमुख अनंत तारट यांना विचारले असता त्यांनी सांगितले क अतिरिक्त वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती गरज पडल्यास नियुक्ती केल्या जाऊ शकते.
सेटल बस फेरी सुरू केल्यास विधार्थी गैरसोय टाळता येते
सध्या परिवहन महामंडळाच्या प्रत्येक आगारात बसेसचा तुटवडा दिसून येत आहे त्यातच अनेक बसेस नादुरुस्त आहे तर कोणती बस केव्हा फेल ठरेल याचा नेमच नाही त्यामुळे प्रवाशाना व शालेय विधार्थयाना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो किंवा कधी कधी बस फेलचे कारण करून ग्रामीण विधार्थ्याना शाळेत येण्याकरिता बस वेळेवर उपलब्ध होत नाही त्यात विधार्थयांचे शैक्षणिक नुकसान होत आहे जर काटोल कोंढाळी शेटल बस सुरू केली तर ग्रामीण भागात शालेय शेड्युल फेल ठरला त्यावेळी कोंढाळी काटोल बुसफेरी थांबून कोंढाळी वरून वेळेवर विधारत्यांकरिता याच बसचा वाहतूक नियंत्रक उपयोग करून विधार्थी शालेय शेड्युल सुरळीत करू शकतात त्यामुळे विधार्थयाना वेळेवर शाळेत व घरी जाण्यास मदत होईल याकरिता ही बस सेवा सुरू करण्याची मागणी पालकासह विधार्थयानि केली आहे.