काटोल आगाराला मिळणार नविन बसेस सलील देशमुखांच्या मागणीला मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन

काटोल, प्रतिनीधी
काटोल येथील आगारामध्ये बसेस कमी असल्याने सलील देशमुख यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबई येथे भेट घेवून नवीन 30 बसेसची मागणी केली. यावरुन सरनाईक यांनी लवकरच नविन बसेस देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी दिली.
ग्रामिण भागात फिरत असतांना अनेक नागरीकांनी बसेसची मागणी सलील देशमुख यांच्याकडे केली होती. यानंतर सलील देशमुख यांनी काटोल आगार प्रमुख यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत काटोल आगारात सुरुवातीला 78 बसेस होत्या. परंतु यातील काही खराब झाल्याने आता केवळ 51 बसेस असल्याची बाब या बैठकीत समोर आली. कमी बसेस असल्याने याचा फटका हा विद्यार्थी, कर्मचारी व ग्रामिण भागातील नागरीकांना बसत आहे. यामुळे किमीन 30 नवीन बसेस मिळाव्या अशी माहिती अधिकाऱ्यांनी सलील देशमुख दिली.
यावरुन सलील देशमुख यांनी मुंबई येथे मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट घेवून काटोल आगाराला 30 बसेस देण्याची मागणी केली. सध्या नविन बसेस कमी असल्याने लवकरच 10 बसेस देण्यात येईल आणि उर्वरीत बसेस या टप्पाटप्याने देण्यात येईल असे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सलील देशमुख यांना दिले. नविन बसेस देण्याची मागणी मान्य केल्याबदल सलील देशमुख यांनी त्यांचे आभार मानले.