कांद्री-कन्हान येथे (दि.२८) ऑगस्ट ला सीएमइ जीपी योजना मार्गदर्शन शिबिर
Summary
कन्हान : – ऑल सर्विस प्रोव्हाइडर आणि मारोतराव पानतावने कॉलेज कांद्री-कन्हान यांच्या सयुक्त विद्यमा ने मारोतराव पानतावने कॉलेज, गहुहिवरा रोड कांद्री-कन्हान येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजने अंतर्गत एक दिवसीय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कन्हान परिसरातील युवक […]
कन्हान : – ऑल सर्विस प्रोव्हाइडर आणि मारोतराव पानतावने कॉलेज कांद्री-कन्हान यांच्या सयुक्त विद्यमा ने मारोतराव पानतावने कॉलेज, गहुहिवरा रोड कांद्री-कन्हान येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजने अंतर्गत एक दिवसीय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
कन्हान परिसरातील युवक व नागरिकांना मुख्य मंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या शासनाच्या योजने बाबद सविस्तर माहिती व्हावी आणि लाभ घेण्याच्या निमित्याने शनिवार (दि.२८) ऑगस्ट २०२१ ला सका ळी १०.३० वाजता मारोतराव पानतावने कॉलेज, गहु हिवरा रोड कांद्री-कन्हान येथील शिबीरात आयु हेमंत जी वाघमारे, मुख्याधिकारी एम सी ई डी हिंगना यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कन्हान-कांद्री परिसरात लघु उद्योग, स्वरोजगार, क्लस्टर आदी उभारण्यात यावे आणि नवीन उद्योग व रोजगार निर्मिती हा प्रमुख उद्देश सार्थ करण्याच्या दुष्टीने मुख्यमंत्री रोजगार निर्मि ती कार्यक्रम या योजनेचे एक दिवसीय मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात मोठया संख्येने कन्हान परिसरातील युवकांनी, स्वरोज गार करणाऱ्या इछुक नागरिकांनी उपस्थित राहुन मार्ग दर्शन कार्यक्रमाचा लाभ घेत परिसरातील विकासा करिता हातभार लावावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक इंजी प्रा अश्वमेघ पाटिल हयांनी केले आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क