कस्तूरी शिक्षण संस्थेच्या, मुक्त विद्यापीठ चे शालेय व्यवस्थापन पदविकाचे (डी एस एम) चे मार्गदर्शन .
Summary
पुणे – कस्तुरी शिक्षण संस्था शिक्रापूर येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.रमेश कळमकर सर यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला , व त्याने आपल्या अनुभवाचे उदाहरण देऊन विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी […]
पुणे – कस्तुरी शिक्षण संस्था शिक्रापूर येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.रमेश कळमकर सर यांच्या हस्ते थाटात संपन्न झाला , व त्याने आपल्या अनुभवाचे उदाहरण देऊन विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कस्तूरी शिक्षण संस्थेच्या, शिक्षण शास्त्र महाविद्यायाचे प्राचार्य हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संमोहन तज्ञ डॉ. जगदिश राठोड यांनी शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षक विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि ,हे प्रशिक्षण फक्त शाळा महाविद्यालयात शिक्षक मुख्याध्यापक आणि प्राचार्य होण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जीवनाचे व्यवस्थापन करण्यासाठी आहे ., असे मत व्यक्त केले . तसेच प्राध्यापक संजय राऊत यांनी अभ्यासक्रम विषयी सविस्तर माहिती सांगितली . तसेच या कार्यक्रमात डी.एस. एम विध्यार्थ्याचे परिचय घेऊन मनोगत व्यक्त करण्यात आले .या कार्यक्रमाचे संचालन प्रा. भगवान खैरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका सिमा म्हस्के यांनी केले. या प्रसंगी डी.एस एम. आणि बी. एड चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .