पर्यावरण पुणे महाराष्ट्र हेडलाइन

कस्तुरी शिक्षण संस्थेत निसर्ग दिना निमित्त औषधी वनस्पती बाबतचे मार्गदर्शन

Summary

शिक्रापूर – नुकतेच कस्तुरी शिक्षण संस्थेचे बी. एड. व फार्मासी कॉलेजचा संयुक्त स्वरूपात निसर्ग दिन साजरा करताना वनस्पती तज्ञ डॉ. पोपट जगदाळे सर यांनी वन औषधी वनस्पतीचे संवर्धन व उपयोग या बाबतची माहित दिली. ही माहिती कस्तुरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा […]

शिक्रापूर –
नुकतेच कस्तुरी शिक्षण संस्थेचे बी. एड. व फार्मासी कॉलेजचा संयुक्त स्वरूपात निसर्ग दिन साजरा करताना वनस्पती तज्ञ डॉ. पोपट जगदाळे सर यांनी वन औषधी वनस्पतीचे संवर्धन व उपयोग या बाबतची माहित दिली. ही माहिती कस्तुरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री पालांडे मॅडम व संस्थापक अध्यक्ष डॉ. पंडित पालांडे सर यांच्या प्रोत्साहनाने निर्माण केला गेलेला वन औषधी वनस्पती चा बगीचा येथे प्रत्यक्षात आयोजीत करण्यात आले होते.
सविस्तर वृत्त असे की निसर्ग दिन साजरा करत असताना संपूर्ण विद्यार्थी व छात्र अध्यापकाना वन औषधी बाबत जनजागृती व्हावी म्हणून हा निसर्ग दीन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय डॉ.जगदाळे सर यांनी विविध औषधी वनस्पतीचे संवर्धन कसे करायचे व ते औषधी वनस्पती कुठल्या आजारावर उपयुक्त आहेत या बाबत सखोल माहिती दिली.या प्रसंगी बी. एड महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. जगदीश राठोड सर व फर्मासी कॉलेजच्या प्रा.डॉ. रुपाली ढमढरे मॅडम यांनी प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन बी.एड व फार्मसी कॉलेजकडून केले होते. या कार्यक्रमात प्रा. संजय राऊत प्रा. निखिल जगताप प्रा. सीमा म्हस्के मॅडम तसेच फर्माशी कॉलेज चे प्रा. धनश्री पुंढे, प्रा. स्नेहल कडबाने प्रा. प्रणिता पवार प्रा. विशाखा राणे . प्रा.नेहा परटे. ,प्रा. लोखंडे सर, प्रा. धनश्री चिवटे , पुनम लांघे उपस्थिती होते. तसेच बी एड व फार्मसी चे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून मार्गदर्शनचा फायदा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *