पुणे महाराष्ट्र हेडलाइन

कराटे पट्टू कुमारी सोनल राठोड हिचा डॉ. जगदिश राठोड यांच्या हस्ते बंजारा सेवा अभियान च्या वतीने भव्य सत्कार

Summary

पुणे :- पुणे शिक्रापूर येथील डॉ.कैलास राठोड यांची कन्या कु.सोनल कैलास राठोड हिने चंदीगड राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धेत ब्रांझ मेंढल मिळाल्याबद्दल संमोहन तज्ञ तथा प्राचार्य डॉ. जगदिश राठोड यांच्या हस्ते बंजारा शिक्षण सेवा अभियान च्या वतीने भव्य […]

पुणे :- पुणे शिक्रापूर येथील डॉ.कैलास राठोड यांची कन्या कु.सोनल कैलास राठोड हिने चंदीगड राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धेत ब्रांझ मेंढल मिळाल्याबद्दल संमोहन तज्ञ तथा प्राचार्य डॉ. जगदिश राठोड यांच्या हस्ते बंजारा शिक्षण सेवा अभियान च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला
सविस्तर वृत्त असे की कु. सोनल राठोड ही अतिशय कष्टाळू ,मेहनती व धैर्यवान बंजारा युती आहे ,आई व वडील डॉ.कैलास राठोड यांच्या प्रोत्सानामुळे ती सतत कराटेचे सराव करत होती . बंजारा समाजातील प्रत्येक युवती व महिलांनी या विद्यार्थिनी कडून प्रेरणा घ्यावी अशी कामगिरी राष्ट्रीय स्तरापर्यंत जाणारी एकमेव बंजारा युवतीने केली आहे .

या राष्ट्रीय कराटे चॅम्पियन स्पर्धेत ब्राझ मेडल मुळे सर्वत्र कौतुक होत आहे प्रत्यक्ष सत्कार करताना बंजारा युवक युवतीने कु. सोनल कडून प्रेरणा घेऊन राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात आपले नाव चमकवावे असे सांगून संमोहन तज्ञ प्राचार्य डॉ. जगदिश राठोड सर यांनी कुमारी सोनल ला पुष्पगुच्छ प्रमाणपत्र व मेडल ने सन्मानित केले. याप्रसंगी सनराईज कॉन्सिलिंग इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर श्री सूर्यकांत राठोड सर यांनी सोनल हिच्या घेतलेल्या कराटे स्पर्धेतील राष्ट्रीय स्तरावर च्या भरारीचे कौतुक केले व सांगितले की बंजारा समाजाने या प्रगतीची नोंद घ्यावी व आपल्या समाज प्रत्येक क्षेत्रात पुढे राहावे असे सांगितले याप्रसंगी कस्तुरी शिक्षण संस्था येथे होत असलेल्या सत्कारात, सत्कार करताना प्रसिद्ध गायिका वर्षा पाटील तसेच शिक्षिका कल्पना पाटील व वनविभागात कार्यरत असलेल्या अधिकारी सुषमा पाटील आणि प्रा.सीमा मस्के व प्रा.मनीषा कवठाळे ह्या उपस्थित होत्या तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील एम ए एज्युकेशन डी एस एम, बीएड चे विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते या प्रसंगी सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे कु सोनल राठोड चे कौतुक करून प्रतिसाद दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *