*कन्हान, साटक ला २१० जेष्ठ नागरिकांना कोरोना व्यक्सीन लावल्या.* प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान १४० व साटक ७० अश्या २१० नागरिकांना व्यक्सीन लावल्या.
*नागपूर* कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यकतीना कोरोना व्यक्सीन १७० तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे ७० नागरिकांना अश्या २१० नागरिकांना व्यक्सीन लावण्यात आल्या. असुन कोरोना प्रतिबंधक उपाय योजना व नियमाची काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
आपल्या राज्यात मार्च २०२० पासुन कोरोना विषाणु आजाराचा प्रादुर्भाव वाढुन सर्वसामान्याना भयंकर हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्या आहे. शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्या वरील जेष्ठ नागरिक व ४० वर्षा वरील दुर्धर आजाराच्या नागरिकां ना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता लस देण्यास शुक्रवार (दि.५) मार्च पासुन सुरूवात करण्या त आली असुन सोमवार (दि.८) मार्च ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे १४० व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ला ७० अश्या २१० नागरिकांना व्यक्सीन लावण्यात ़आली. ही कामगीरी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेंद्र चौधरी, डॉ. गोंडाणे मॅडम, सिस्टर माया कंभाले, श्रीमती गाणार, अजय राऊत, के मेश्राम, सुरेंद्र गि-हे, आशिष कोल्हे, सांगोडे, माहुरिया तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र साटक डॉ प्रज्ञा आगरे, डॉ तिवारी, आपोग्य परिवक्षक अशोक सोनटक्के, नंदकिशोर डोईफोडे, दामोधर ठोंबरे, उषा चव्हाण, प्रेरणा घोटेकर, कल्पना निमकर, सचिन मानकर, मंगेश खोडे, उईके आदी परिश्रम करित आहेत. दिवसेदिवस नागपुर जिल्हयात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोना लस जरी देणे सुरू झाली तरी नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमाचे पालन करित मॉस्क लावणे, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कामानिमित्यच घरा बाहेर निघणे, लक्षणे जाणवल्यास कोरोना तपासणी करून घेणे. आदीचे काटेकोरपणे पालन केल्यास या विषाणुजन्य आजारावर विजय मिळवता ृयेईल असे आवाहन डॉ योगेंद्र चौधरी व डॉ प्रज्ञा आगरे हयानी केले आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9158239147