कन्हान शहर विकास मंच द्वारे जागतिक नर्स दिवस थाटात साजरा. प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या नर्सचे वळाचे वृक्ष देऊन सत्कार.
*नागपूर* कन्हान : – देशात कोरोना मुळे हाहाकार मचला असुन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंन्द्रात, शासकीय रुग्णाल यात, खाजगी रुग्णालयात नर्स दिवस रात्र आपले जीव धोक्यात घालुन रुग्णांची सेवा करत असुन नागरिकांना कोरोना वैक्सीन लसीकरण सुद्धा नर्स लावत आहे. अश्या कोरोना योद्धांना कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे वळाच वृक्ष देऊनं सत्कार करून जागतिक नर्स दिवस थाटात साजरा.
बुधवार (दि.१२) मे २०२१ ला जागतिक नर्स दिवसा निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे प्राथ मिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथील नर्स आपल्या जिवा ची परवा न करता दिवसरात्र रूग्ण सेवेचे कार्य करित कोरोना महामारी संकट काळात स्वत:चा जीव धोक्या त घालुन कोरोना रूग्णांची सेवा करीत असुन त्यांना विविध औषधी उपचार, इंजेक्शन, मार्गदर्शन करित रूग्णाचे जीव वाचविण्याकरिता मौलाचे कार्य करून कोरोना पासुन मुक्त करीत आहे. तसेच नागरिकांची कोरोना रूग्ण तपासणी, लसीकरण सुद्धा नर्सच करित आहे. अश्या ख-या कोरोना योद्धा नर्सना कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथील नर्सना वळाच वृक्ष देऊनं सत्कार करून जागतिक नर्स दिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, डॉ गोंडाने मॅडम, हरडे सिस्टर, कमले सिस्टर, हटवार सिस्टर आदी कर्मचारी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535