कन्हान शहरात कोरोना काळातील सर्व नियम व निर्बंध कडक करण्याची मागणी
कन्हान शहरात कोरोना काळातील सर्व नियम व निर्बंध कडक करण्याची मागणी
कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यांचे नप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन.
कन्हान : – महाराष्ट्र राज्यात नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन चा संसर्ग सातत्याने वाढत असुन नागपुर शहरात एक ओमिक्रॉनचा रुग्ण आढळुन सुद्धा कन्हान शहर व परि सरात कोरोना काळातील सर्व नियमाचे उल्लंघन होत असल्यावरही कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन कुठ ल्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याने कन्हान शह र विकास मंच च्या पदाधिका-यानी नप मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन देऊन तात्काळ उपाययोज ना करित शहरात व परिसरात कोरोना काळातील सर्व नियम व निर्बंध कडक करण्याची मागणी केली आहे.
देशात, राज्यात, जिल्ह्यात मागील दोन वर्षा पासुन कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असुन ग्रामीण भागात कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. परंतु राज्य शासनाने कोरोना काळातील नियम व निर्बं ध कायम ठेवले असुन सुद्धा शहरात व बाजारात कोरो ना काळातील सर्व नियमाचे उल्लंघन होत आहे. केंद्र शासना ने काही दिवसापुर्वी देशासह संपुर्ण राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव होण्याचे संकेत दिले होते. आ णि नवीन गाईड लाईंन्स सुद्धा बनविण्यात आली होती . त्यानंतर देशात ओमिक्राॅनचा शिरकाव होत सध्या ७० ओमिक्राॅन रुग्णांची नोंद झाली आहे. यात महाराष्ट्र राज्यात ३२ ओमिक्राॅन रुग्णांची नोंद असुन नागपुर शहरात १ओमिक्राॅन रुग्ण आढळला तरी सुद्धा कन्हान -पिपरी नगरपरिषद प्रशासन कुठल्याही प्रकारची कार वाई करत नसल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधि का-यानी मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यां च्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी हर्षल गायकवाड व नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांना भेटुन गंभीर विषयावर चर्चा करून निवेदन देऊन तात्काळ उपाय योजना करून शहरात व परिसरात कोरोना काळातील सर्व नियम व निर्बंध कडक करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे,सचिव हरीओम प्रकाश नारायण, महासचिव सुरज वरखडे, कोषाध्यक्ष महेश शेंडे, सदस्य प्रकाश कुर्वे, शाहरुख खान, भरत सावळे, हर्ष पाटील, किरण ठाकुर, अक्षय फुले, शुभम मंदुरकर सह मंच पदाधिकारी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535